Khandesh Darpan 24x7

जिल्ह्यातील आठ व्यक्ती दर्पणकार पुरस्काराचे मानकरी




 प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जळगांव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजीच्या दर्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात होणार आहे. 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण  करण्यात येणार आहे. विशेष अतिथी म्हणून  प्र - कुलगुरू प्रो. एस. टी. इंगळे,  उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. तर दर्जी फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळ दर्जी, मंगलग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर, पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रविण सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


या दर्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण आठ जणांना दर्पणकार पुरस्कार जाहीर आले आहेत. यात -


प्रिंट मीडिया :

१) विलास बारी(लोकमत),

२) प्रदीप राजपूत(दिव्यमराठी),

३) देविदास वाणी(सकाळ),

४) राजेंद्र पाटील(पुण्यनगरी),


इलेक्ट्रॉनिक मीडिया :

१) चंद्रशेखर नेवे(एबीपी माझा),

२) सचिन गोसावी(दूरदर्शन),


डिजिटल मीडिया :

संतोष सोनवणे(मॅक्स मराठी)


छायाचित्रकार:

आबा मकासरे (छायाचित्रकार)



तरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव व पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी, नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन माध्यम शास्त्र प्रशाळेचे डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, ऍड.सूर्यकांत देशमुख, रोहित देशमुख,पत्रकार संघांचे खान्देश विभागाचे अध्यक्ष- किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष- शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष- नागराज पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष- संतोष नवले, महानगराध्यक्ष- कमलेश देवरे  यांनी केले आहे.



सन २०२४ इंग्रजी नव वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत आपली जाहिरात खान्देश दर्पण वर अगदी मोफत


फ्री जाहिरात 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post