खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
Difference Between Guarantee And Warranty: डिसेंबर महिन्यामध्ये देशातील छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय मिळवल्यानंतर मोदी की गॅरंटी या घोषणेची चांगलीच चर्चा होती.
यानंतरही अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये गॅरंटी हा शब्द ऐकायला मिळाला. या निमित्ताने पुन्हा एकदा गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये नेमका काय फरक आहे याबद्दलची चर्चा पाहायला मिळतेय. पण खरोखरच अनेकदा एकमेकांना समानार्थी शब्द म्हणून वापरल्या जाणाऱ्या या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच होतो की वेगवेगळा हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच पार्श्वभूमीवर या जाणून घेऊयात याचसंदर्भात...
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
अनेकांना वाटतात समानार्थी शब्द
खरं तर दिवसोंदिवस शॉपिंग करणाऱ्या आणि त्यातही वायफळ शॉपिंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढतेय तशा बाजरपेठा वाढत असून अगदी स्वस्तातील वस्तूंपासून महागड्या वस्तूंपर्यंतची मागणी वाढल्याचं दिसत आहे. मात्र या शॉपिंगदरम्यान अनेकदा गॅरंटी आणि वॉरंटी हे दोन शब्द कानावर पडतात. मात्र या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे? खरेदीच्या वेळी कानावर पडणाऱ्या या शब्दांना बऱ्याचा एकमेकांना पुरक शब्द म्हणून पाहिलं जातं. तुम्हाला या शब्दांमधील फरक माहिती नसेल तर शॉपिंग दरम्यान तुम्हाला फटका बसू शकतो.
वॉरंटीचा अर्थ काय?
तुम्ही विकत घेतलेली वस्तू वॉरंटीमध्ये असेल तर ती वस्तू मोफतमध्ये दुरुस्त करुन दिली जाते. वॉरंटीचा एक निश्चित कालावधी ठरवलेला असतो. वॉरंटीमध्ये तुम्हाला खराब झालेली वस्तू बदलून दिली जात नाही तर ती दुरुस्त करुन दिली जाते.
वॉरंटीचा लाभ घेण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूंचं बील आणि इतर तपशील ग्राहकांकडे असण्याची आवश्यकता असते. बील नसेल तर वॉरंटीचा लाभ घेता येत नाही. वॉरंटी ही लेखी स्वरुपात असते. वॉरंटीमध्ये तुम्हाला बिघडलेली वस्तू नको असेल तर रिफंड म्हणजेच मोजलेली किंमत परत मिळत नाही.
गॅरंटीचा अर्थ काय?
वॉरंटीपेक्षा ग्राहकांना गॅरंटी अधिक फायद्याची असते. कारण यामध्ये वस्तू खराब झाल्यास ती संपूर्ण बदलून दिली जाते. यामध्ये खराब झालेल्या वस्तूच्या मोबदल्यात पूर्णपणे नवा प्रोडक्टच ग्राहकांना दिला जातो. गॅरंटीचा लाभही बील असेल तरच मिळतो.
गॅरंटीमध्ये सामान्यपणे कंपन्या आतील स्पेअरपार्टची जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळेच ते संपूर्ण प्रोडक्टच बदलून देतात. गॅरंटीमध्ये ग्राहकांना पूर्णपणे नवीन प्रोडक्ट मिळतो. गॅरंटी ही लेखी किंवा तोंडी स्वरुपातही असू शकते. गॅरंटीमध्ये बिघडलेली वस्तू नको असेल तर ग्राहकांना त्यांचे पैसे परत देणं अपेक्षित असतं.
आता यावरुन तुम्हाला गॅरंटी ही वॉरंटीपेक्षा अधिक फायद्याची असते हे लक्षात आलं असेल. त्यामुळेच यापुढे जेव्हा बिघडलेल्या नवीन वस्तू दुकानदारांकडे घेऊन जाल तेव्हा त्यावर गॅरंटी आहे की वॉरंटी ते तपासून पाहा आणि तशाप्रकारेच रिप्लेसमेंट अथवा दुरुस्तीची मागणी करा.
Zee 24 Taas Updated: Jan 5, 2024, 12:16 PM IST
Post a Comment