Khandesh Darpan 24x7

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान



 खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   



22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दरम्यान देशभरातील 11 जोडप्यांना या महापुजेचा मान मिळाला आहे. ज्या 11 दाम्पत्यांना महापुजेसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा देखील समावेश आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावं आहेत.


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



देशभरातील 11 जोडप्याना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दाम्पत्याचा देखील समावेश आहे. विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते, त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. विठ्ठल कांबळे हे पेशानं शिक्षक आहेत. तसेच ते आरएसएसचे रायगड जिल्हा सेक्रेटरी देखील आहेत.



राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील महत्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती. मात्र त्यांनाच निमंत्रण येईल आणि ते देखील थेट रामलल्लांच्या पूजेचा मान मिळेल अशी कल्पना देखील त्यांनी केली नव्हती. त्यामुळे आयुष्याचे सार्थक झाले अशी प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी व्यक्त केली आहे. 


यासोबतच त्यांच्या पत्नी उज्वला कांबळे यांनी हे सगळं अद्भुत असून आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने महाराष्ट्राची पैठणी साडी नेसून रामलल्लांच्या पूजेला बसणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त आहे.

News18 marathi JANUARY 19, 2024, 1:15 PM IST


जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post