Khandesh Darpan 24x7

पाकिस्तानमध्ये 14 फेब्रुवारीला साजरा होत नाही व्हॅलेंटाइन्स डे; काय आहे कारण?



 खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   



सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून
व्हॅलेंटाइन्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रेमी जोडपी या दिवसाची अतिशय आतुरतेनं वाट बघत असतात. व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाल्यामुळे जगभरातल्या प्रेमी युगलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. विविध गोष्टींच्या माध्यमातून आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी व्हॅलेंटाइन वीकमध्ये मिळते. 


पाश्चात्य देशांमधून सुरुवात झालेली परंपरा आता जगातल्या बहुतांश देशांमध्ये फॉलो केली जाते. अगदी भारतामध्येसुद्धा नव्या पिढीतली कपल्स व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. धार्मिक कट्टरतेसाठी ओळखला जाणारा पाकिस्तान मात्र याला अपवाद आहे.



जाहिरात 



संपूर्ण जग व्हॅलेंटाइन डेच्या रंगात रंगलेलं असताना पाकिस्तानमध्ये मात्र वेगळंच वातावरण असते. तिथे 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून नाही तर ‘हाया डे’ म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाइन डे हे पाश्चात्य संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्याला तीव्र विरोध केला जातो. पाश्चात्य संस्कृतीला विरोध करण्यासाठी हा दिवस तिथे हाया डे म्हणून साजरा केला जातो.



पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून हाया डे चा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पूर्वी तिथे अशा प्रकारचा विरोध होत नव्हता. व्हॅलेंटाइन डे हा मुस्लिम धर्माच्या विरोधात आहे असं तिथे मानलं जातं. अनेक धार्मिक संघटनांनी या दिवसाला ‘विचेस डे’ असं नाव दिलं आहे. ते व्हॅलेंटाइन डेला हडळीसारख्या नकारत्मक शक्तीचा दिवस मानतात.



जाहिरात 




पाकिस्तानमध्ये या दिवशी, मोठ्या संख्येनं मुलं आणि मुली बॅनर व पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरतात. ते व्हॅलेंटाइन डेच्या विरोधात घोषणा देतात. अनेक धार्मिक संघटना या दिवशी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास विरोध करतात. हा हाया डे म्हणून साजरा होण्यासाठी रॅली आणि मिरवणुका काढल्या जातात.



रावळपिंडीच्या जिल्हा समितीने लोकांना व्हॅलेंटाइन डेपासून दूर राहण्यास सांगितलं. अशा प्रकारचे दिवस हे पाकिस्तानी तरुणांना बिघडवण्याचं षड्यंत्र असल्याचंही या समितीने म्हटलं आहे. या दिवशी तरुणांना मोबाइलपासून दूर ठेवण्याची मागणीही या समितीने केली होती.



मुस्लिम धर्माचं पालन करणाऱ्या पाकिस्तानमध्ये धार्मिक कट्टरता मोठ्या प्रमाणात पाळली जाते. मुस्लिम धर्मामध्ये उघडपणे प्रेम व्यक्त करणं योग्य मानलं जात नाही. अगदी लग्नसोहळ्यांमध्ये सुद्धा या नियमांचं पालन केलं जातं. निकाह पढण्यापूर्वी पती-पत्नी एकमेकांचा चेहरा बघत नाहीत.

 PUBLISHED BY :News18 Marathi FEBRUARY 9, 2024, 11:14 PM IST

https://news18marathi.com/viral/valentines-day-is-not-celebrated-on-february-14-in-pakistan-what-is-the-reason-gh-mhsz-1125159.html

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم