खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
खान्देशात यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यातच तापमान वाढले आहे. सोमवारी भुसावळचे कमाल तापमान ३७.३ अंशांच्या उच्चांकी पातळीवर गेले. गेल्या वर्षी २५ फेब्रुवारीनंतर तापमान ३८.६ अंशांवर गेले हाेते, यंदा मात्र १८ फेब्रुवारीलाच उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत. राज्यात साेमवारी अकाेला आणि साेलापूरमध्ये ३६.८ अंश, तर जळगाव, मालेगावात ३६.२ अंश तापमान नाेंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात तापमानात २ ते ३ अंशांची वाढ हाेऊ शकते. राज्यात मार्चपूर्वी यंदा तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात थंडीची तीव्रता कमी हाेऊन कमाल आणि किमान तापमानात वाढ हाेत आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गेल्या दाेन दिवसांमध्ये राज्यात सर्वाधिक उच्चांकी तापमान नाेंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे जलाशयातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे.
जाहिरात
जवळपास दोन दिवसापूर्वी शहरांचे कमाल तापमान
अकाेला ३६.८
साेलापूर ३६.८
जळगाव ३६.२
मालेगाव ३६.२
चंद्रपूर ३४.८
नाशिक ३३.१
संभाजीनगर ३३.८
पुणे ३४.९
अमरावती ३४.८ (अंश सेल्सियस)
जाहिरात
पारा 25 फेब्रुवारीनंतर 38 अंशांवर जाणार परीक्षा कालावधीत वातावरणीय बदलाने विद्यार्थ्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवणार
थंडी गायब झाली असून, आता तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. तापमानात सतत चढ-उतार होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आहे. २५ फेब्रुवारीनंतर ३८ अंशांपर्यंत तापमान जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर १ मार्चपासून इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. या कालावधीत ‘सरप्राइज वेदर’ राहणार आहे. अर्थात, तापमानामध्ये नियमित बदल होत राहणे होय. एखाद्या दिवशी अचानक जास्त थंडी जाणवेल तर दुसऱ्या दिवशी प्रचंड उष्णता असे हे कॉम्बिनेशन राहील. या वातावरणामुळे व्हायरल फिव्हर व डोकेदुखी, मायग्रेनच्या समस्या उद्भवू शकतात.
जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा देणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्याच्या सुरुवातीला वातावरणात बदल होणार असल्याने विद्यार्थ्यांनी विशेषतः जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ‘चेंजिंग वेदर’ आणि ‘चेंजिंग लाइफस्टाइल’ या कारणाने प्रकृतीवर प्रचंड परिणाम होऊन व्हायरल फिव्हर, डोकेदुखी, मायग्रेन अशा समस्या उद्भतील असे तज्ज्ञ सांगतात.
जाहिरात
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
अशी घ्या काळजी : नियमित वेळापत्रकानुसार जेवण करणे आरोग्यास फायद्याचे
आहार : हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश आहारात करा. थंड पदार्थ, थंड पेय, जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा. पुरेसे पाणी प्या. नियमित वेळापत्रकानुसार जेवण करण्यावर भर द्यावा.
तणाव व्यवस्थापन : टेन्शन न घेता योग, ध्यान किंवा श्वास घेण्याच्या तंत्राचा सराव करा. परीक्षेच्या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करा, गरजेनुसार मित्र, कुटुंब किंवा समुपदेशकाशी बोला. छंद जोपासा.
स्वच्छता : नियमितपणे हात धुवा, खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवायला हवे. हवामानाचा अंदाज तपासा आणि त्यानुसार कपडे घाला. कुलरच्या थंड हवेत बसलेले असाल तर लगेच उन्हात बाहेर जाऊ नका.
तापमान २५ पासून वाढण्याची शक्यता
कमाल तापमानात २५ फेब्रुवारीपासून दोन ते चार डिग्री सेल्सिअसने वाढ होऊन सकाळी ११ वाजेपासून उष्णतेची तीव्रता जाणवणार आहे. २५ ते २९ फेब्रुवारी दरम्यान कमाल तापमान ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/mercury-will-go-up-to-38-degrees-after-february-25-132607209.html
जाहिरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق