Khandesh Darpan 24x7

छत्रपती शिवरायानां अपेक्षित रयतेचे राज्य उभे करण्यासाठी संविधान साक्षर होणे गरजेचे - शमिभा पाटील

 


प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सम्राट फाउंडेशनच्या 'आम्ही संविधानवादी' या विशेष उपक्रमाअंतर्गत आज दत्तक गाव म्हणून 'संविधान ग्राम'  वाघोदा  बुll ता. रावेर येथे बसस्थानका समोर फलक अनावरण तसेच ग्रामफेरी काढण्यात आली. त्यावेळी, लोकशाहीचा सन्मान भारतीय संविधान, स्त्रीशक्तीचा करी सन्मान भारतीय संविधान अश्या घोषणानीं गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.  सर्चलाईट इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थ्यी तसेच वाघोदा येथील ग्रामस्थ युवक युवती व स्त्री पुरुषानीं उत्फुर्तपणे सहभाग घेतला. 


जाहिरात 

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


प्रसंगी बोलतानां 'आम्ही संविधानवादी' च्या समन्वयक शमिभा पाटील म्हणाल्या, संविधानाची ७५ वर्षे आपण साजरी करत आहोत आता आपल्याला अधिकार तर समजले पण कर्तव्य व जबाबदारी समजून घेत लोकशाही खरा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी संविधान साक्षर होणे ही भारतीय म्हणून प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज आहे. या उपक्रमातून आपल्या गावात पुरूष  महिला, युवकयुवती, लहान मुले  संविधान अभ्यासवर्ग चालविले जातील तसेच संविधान आधारीत उपक्रमाच्या माध्यमातून सक्षम भारतीय म्हणून ओळख देणारी पिढी घडविण्याची जबाबदारी या चळवळीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत.



कार्यक्रमाचे निर्देशक अनोमदर्शी तायडे यांनी आपल्या मनोगतात, संविधान हा प्रत्येकाच्या अधिकाराचा जाहीरनामा आहे. त्यात सजीव निर्जीव यांचा समावेश केल्याचे दिसते. देश म्हणून उभे राहतानां आधी नागरिकांचे आत्मभान संविधानाच्या साक्षरतेतुन निर्माण होणे गरजेचे आहे. गल्ली ते दिल्ली देश म्हणून चालविण्यासाठी असलेल्या संविधानाचा केंद्रबिंदू हा माणसाचे हित आहे. व ते आपण समजून घेतले पाहिजे.


या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाघोदा गावचे उपसरपंच अजय तडवी, माजी सरपंच राजू सावळे, ग्रा. पं. सदस्य आनंद भालेराव, योगेश जाधव, अक्षय वाघ, चंदू वाघ, गोविंदा लहासे, अंकुश मेढे, तुषार वाघ, गौतम वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते. 


जाहिरात 


यावेळी आम्ही संविधानवादी समूहाचे ईश्वर लहासे, महेंद्र वाघ, करण तायडे, कुंदन वाघ, शंकर बोदडे, अमोल वाघ, अतुल लहासे यांच्यासह सर्च लाईट इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


या उपक्रमाला विशेष सहकार्य म्हणून  रिस्पेक्ट फाउंडेशनचे चिनावल, गाते, स्टेशन,  उदळी, न्हावी, रोझोदा, वडगाव येथील सदस्य व गावातील असंख्य महिला पुरुष सहभागी होते.


जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post