प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
जगामध्ये संत अनेक आहेत होतील पण महान तपस्वी विशेष त्यागी रूप उच्च स्थानी असलेले दिगंबर जैन संत आचार्य भगवंत श्री. विद्यासागरजी सारखे संत या धरावर पुनः अवतरीत होणे कठीण आहे.
आचार्य भगवंत 17 फेब्रू रोजी मध्य रात्री आपल्या सर्व भक्त परीवार ला सोडून त्यांचा देह त्याग करून स्वर्गरुपी रत्नत्रय चा महामार्ग वर विराजित झाले त्या भक्तिरुपी सावदा येथील श्री.चंद्रप्रभ व सहस्रकुट जैन मंदिर सावदा येथे नूतन पंच कमिटी ने सर्व समाज बांधवांसोबत आचार्य भगवंत यांना भक्ती रूपात सामुहिक विनयांजली देण्यात आली.
गुरु श्री ला उपस्थित समाज बांधवांनी शब्द रुपी भक्तीने विनयांजली दिली. आचार्य भगवंत आपल्या सर्वांना देह रुपी सोडून गेले असले तरी त्यांची वात्सल्य रुपी मुर्ती सर्वांच्या मन मंदिर मध्ये जन्मोजन्मी राहिलं असे दिव्य स्वरूप ने आपल्या सावदा भुमी ला त्यांचे चरण लावून ही भूमी पावन तिर्थ रूप करून दिली असल्याचे उदगार व्यक्त झाले.
अध्यक्ष डॉ. दिपक जैन, उपाध्यक्ष देवेंद्र अन्नदाते, सचिव विमलेश जैन, अभिजित मिटकर व योगेश जैन व उपस्थित सर्व समाज बांधव यांनी आपण आचार्य भगवंत श्री विद्यासागर महामुनिराज यांच्या जिवनकाल मध्ये जन्म घेतल्या चे सार्थकता मानून, आपण सर्व भक्तांनी जिनेंद्र भक्ति करणे हिच पूज्य गुरुदेव श्री यांना आपली विनयांजली राहिल, तसेच गुरुदेव श्री यांच्या वाणी मधून उच्चारित झालेल्या ओमकाराय नमो नमः महामंत्र जाप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment