Khandesh Darpan 24x7

चला रे भो…अयोध्या! खान्देशातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता धुळ्यातून थेट अयोध्येला ‘लालपरी’

अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून विशेष अयोध्येसाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून धुळे आगारातून अयोध्येसाठी पहिली लालपरी धावणार





 खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानंतर आता अयोध्येतील रामाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत दाखल होताना दिसताय. 


अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून विशेष अयोध्येसाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून धुळे आगारातून अयोध्येसाठी पहिली लालपरी धावणार आहे. 


अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना या बसद्वारे वाराणसी आणि प्रयागराज या ठिकाणी देखील जाता येणार आहे. अयोध्येकरता जाण्यासाठी प्रवाशांना 4 हजार 545 रुपये इतके भाडे आकारले जाणार असल्याची माहिती धुळे आगाराकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता खान्देशातील रामभक्तांना धुळ्यातून थेट अयोध्येतील रामलल्लांचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Updated on: Jan 31, 2024 | 3:24 PM TV9 Marathi

जाहिरात 


जाहिरात 



जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم