बलवाडी प्रतिनिधी | आशिश चौधरी
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बलवाडी ता. रावेर येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशस्तंभ अकॅडमीचे संचालक, शाळेचे माजी विद्यार्थी तथा ॲड. विलास तायडे सर विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना वाचन, लेखन, आरोग्य, पर्यावरण, विविध गीते, बोधकथा सांगून तायडे सरांनी विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. बोलत असताना "वाचनाने माणूस समृध्द होतो" हा मौलिक सल्ला सरांनी दिला.
प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन उपशिक्षक अरविंद पाटील सर यांनी केले. तर आभार एकनाथ चौधरी यांनी मांडले. शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment