व्हॅलेंटाइन वीक सुरू झाल्यापासून सगळ्या बाजारपेठा फुलं आणि भेटवस्तूंनी भरगच्च झालेल्या दिसत आहेत. सगळीकडे हार्ट शेपचे फुगे, वस्तू दिसतात; पण आपल्या खऱ्या हृदयाचा आकार तर असा नाही!
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
व्हॅलेंटाइन वीक सुरू झाल्यापासून सगळ्या बाजारपेठा फुलं आणि भेटवस्तूंनी भरगच्च झालेल्या दिसत आहेत. सगळीकडे हार्ट शेपचे फुगे, वस्तू दिसतात; पण आपल्या खऱ्या हृदयाचा आकार तर असा नाही! मग व्हॅलेंटाइनमधल्या प्रेम व्यक्त करण्यासाठीचा हृदयाचा हा आकार नेमका आला तरी कुठून, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या संदर्भात
व्हॅलेंटाइन वीकमध्ये सोशल मीडियापासून वेगवेगळ्या मार्केटपर्यंत तुम्हाला सगळीकडेच हार्ट शेपच्या इमोजी दिसतील. आपल्या शरीरात असलेलं हृदय आणि प्रेमाची कबुली देणारं हे हृदय एकमेकांपेक्षा किती तरी भिन्न आहे.
मानवी शरीरात जे हृदय असतं, ते सुमारे 13 सेंटिमीटर लांबीचं आणि 9 सेंटिमीटर रुंदीचं असतं. त्याचा रंग लाल असून आकार काहीसा त्रिकोणी आहे. ते मांसल आहे. हे छातीच्या मध्यभागी थोडंसं डाव्या बाजूला असतं. हृदय दिवसात जवळपास एक लाख वेळा आणि एका मिनिटात 60 ते 90 वेळा ठोके देत असतं. याशिवाय त्याच्या भोवती एक आवरण असतं. त्याला हृदयावरण असं म्हणतात. त्यामध्ये पेरिकार्डियल द्रव असतो. त्यामुळे हृदयाचं बाह्य आघातांपासून संरक्षण होत असतं.
जाहिरात
हृदयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला झडपा असतात. याशिवाय हृदयात चार कप्पे असतात. यात उजवा भाग शरीरातलं दूषित रक्तप्रवाह घेऊनतो फुफ्फुसाकडे पाठवतं आणि तिथं ते रक्त शुद्ध होऊन हृदयाच्या डाव्या भागाकडे परत जातं. तसंच दोन उजवीकडे आणि दोन डावीकडे असे हृदयात चार व्हॉल्व्ह असतात. रक्तप्रवाहासाठी दिशा दर्शकाचं हे काम करतात.
प्रेमाचं प्रतीक दाखवण्यासाठी साधारपणे हृदय म्हणून जो आकार दर्शवला जातो, तो मूळ हृदयापेक्षा फारच वेगळा आहे. तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटेल की वर्षानुवर्षांपासून प्रेमाचं प्रतीक म्हणून या आकाराचाच वापर केला जातो. हा आकार वास्तविक एका झाडाच्या बीवरून आला आहे. हे बी आज प्रेमाचं प्रतीक दाखविण्यासाठी हृदयाच्या आकाराचं म्हणून वापरलं जातं. सिल्फियम असं या झाडाचं नाव आहे. त्याचा बीचा आकार हार्ट शेपसारखा असतो.
युनानी इतिहासकार आणि भूगोल अभ्यासक हेरोडोटस यांनी हिस्टोरिया IV.169 या आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे, की या झाडाच्या बिया गर्भनिरोधक म्हणून उपयुक्त ठरत असल्याचा शोध लागला होता. काही गोष्टींमध्ये असा दावा करण्यात येतो की, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा जोडप्यांकडून विवाहापूर्वी शरीरसंबंध ठेवले जात होते, तेव्हा गर्भपात करण्यासाठी मुलगा त्या मुलीला हे बी पाठवत असे. अशा प्रकारे हळू हळू या बियांचा आकारच प्रेमाची खूण मानला जाऊ लागला. या संदर्भांनुसार सिल्फियम झाडाच्या बियांचा आकारच प्रेमाची खूण मानू लागले.
परंतु, हे संदर्भ सोशल मीडियावर आहेत. हे संदर्भ कितपत खरे आहेत, याची तपासणी केलेली नाही.
News18 Marathi FEBRUARY 13, 2024, 6:41 AM IST
https://news18marathi.com/viral/how-was-the-shape-of-the-heart-expressed-in-love-formed-mhsz-1127090.html
Post a Comment