२८ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला, म्हणून आपण दर २८ फेब्रुवारीला विज्ञान दिवस साजरा करतो.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
राष्ट्रीय विज्ञान दिवस प्रश्नमंजूषा |
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक सर सी. व्ही. रमण यांनी ‘रमण इफेक्ट’ चा शोध लावला होता, म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो. या दिवशी वैज्ञानिकांच्या योगदानाचा सन्मान करणे, तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनास प्रोत्साहन देण्याचा हेतू असतो. तर आज, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने या विषयाबद्दल आपल्या सर्वांना किती माहिती आहे, हे या लहानश्या प्रश्नमंजुषेतून जाणून घेऊ.
National Science Day 2024 : राष्ट्रीय विज्ञान दिन २०२४
राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. सर सी. व्ही. रमण यांनी १९२८ साली रमण इफेक्टचा शोध लावला होता. त्यांनी लावलेल्या या शोधामुळे सी. व्ही. रमण यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
त्यांना समुद्राच्या निळ्या रंगाचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता होती. निळ्या रंगामागचे कारण समजून घेण्यासाठी त्यांनी पारदर्शक पृष्ठभाग, बर्फाचे तुकडे आणि प्रकाश यांच्यासोबत विविध प्रयोग केले. त्यानंतर बर्फाच्या तुकड्यामधून प्रकाश गेल्यानंतर त्यांनी तरंग लांबीतील बदल पाहिला आणि यालाच रमण प्रभाव असे म्हणतात. त्यांच्या या प्रयोगांमुळे तसेच या शोधाने भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले.
राष्ट्रीय विज्ञान दिन प्रश्नमंजुषा
आज तुम्हाला विज्ञान विषयाची किती माहिती आहे ते पाहण्यासाठी खाली दिलेले दहा प्रश्न सोडवून पाहा.
१.) राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जाणारा रमण इफेक्टचा शोध कुणी लावला?
अ) अल्बर्ट आइन्स्टाईन
ब) आयझॅक न्यूटन
क) सर सी. व्ही. रमण
ड) मेरी क्युरी
उत्तर- क
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला. म्हणून भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.२.) रमण इफेक्टचा शोध कोणत्या वर्षी लागला?
अ) १९२८
ब) १९३०
क) १९४५
ड) १९५२
उत्तर – अ
३.) राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात कधी साजरा केला जातो?
अ) २८ फेब्रुवारी
ब) २६ जानेवारी
क) २२ एप्रिल
ड) १५ मार्च
उत्तर – अ
४.) सर सी. व्ही. रमण यांच्या शोधाचे वैज्ञानिक महत्त्व काय होते?
अ) क्ष-किरणांचा शोध
ब) डीएनए रचनेचा शोध
क) इलेक्ट्रॉनचा शोध
ड) प्रकाशाच्या तरंगलांबीतील बदलाचा शोध
उत्तर – ड
जेव्हा रंगीत प्रकाशाचा किरण द्रवपदार्थात प्रवेश करतो तेव्हा त्या द्रवाने विखुरलेल्या प्रकाशाचा एक अंश वेगळ्या रंगाचा असतो, असे सर सी. व्ही. रमण यांनी १९२८ मध्ये शोधून काढले. रमण यांनी दाखवले की, या विखुरलेल्या प्रकाशाचे स्वरूप हे नमुन्याच्या प्रकारावर अवलंबून आहे.
५.) राष्ट्रीय विज्ञान दिन २०२४ ची थीम काय आहे?
अ) नवोपक्रमासाठी विज्ञान
ब) शाश्वत भविष्यासाठी विज्ञान
क) ग्लोबल हार्मनीसाठी विज्ञान
ड) आरोग्य आणि निरोगीपणासाठी विज्ञान
उत्तर – ब
राष्ट्रीय विज्ञान दिन २०२४ ची थीम ही “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान” [Science for Sustainable Future] अशी आहे.
६.) सर सी. व्ही. रामन यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ शी कोणते भारतीय शहर संबंधित आहे?
अ) कोलकाता
ब) मुंबई
क) बंगलोर
ड) चेन्नई
उत्तर – अ
इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ ही आशियातील सर्वात जुनी संशोधन संस्था आहे.
७.) सर सी. व्ही. रमण यांचे निधन कधी झाले?
अ) २१ नोव्हेंबर १९७०
ब) २१ नोव्हेंबर १९७२
क) २१ ऑक्टोबर १९७०
ड) २१ ऑक्टोबर १९७२
उत्तर – अ
सर सी. व्ही. रमण यांचे निधन २१ नोव्हेंबर १९७० रोजी झाले.
८.) सर सी. व्ही. रमण यांना कोणत्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले?
अ) १९३०
ब) १९४५
क) १९२८
ड) १९५२
उत्तर – अ
चंद्रशेखर वेंकट रमण हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना १९३० सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या शोधला रमण प्रभाव असे म्हटले जाते.
९.) रमण प्रभाव खालील कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे:
अ) प्रकाशाचे परावर्तन
ब) प्रकाशाचे अपवर्तन
क) प्रकाशाचे विखुरणे
ड) प्रकाशाचे शोषण
उत्तर – क
रमण प्रभावामध्ये वायू, द्रव किंवा घन पदार्थांच्या रेणूंद्वारे प्रकाशाचे विखुरणे स्पष्ट केले जाते.
१०.) भारतातील कोणती संस्था राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यास प्रोत्साहन देते?
अ) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
ब) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)
क) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST)
ड) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)
वरील प्रश्नावलीचे उत्तरे आम्हास दि. 5 मार्च 2024 च्या पर्यंत आमच्या ९४२३१८९५७२, ८4८२९६०९२७ या व्हॉटस् ॲप क्रमाकावर संपूर्ण नावासह पाठवा.
प्रश्नाची अचुक उत्तरे खान्देश दर्पण २४x७ या न्युज पोर्टल वर दि. 7 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. विजयी स्पर्धकांची नावे फोटो सह दि. ९ मार्च 2024 ला खान्देश दर्पण २४x७ वर प्रसिद्ध करण्यात येतील..
या प्रश्नावली चे प्रायोजक -
https://www.loksatta.com/trending/national-science-day-2024-can-you-answer-this-science-questions-solve-this-simple-quiz-dha-99-4233024
Post a Comment