Khandesh Darpan 24x7

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान: जाणून घ्या- जिल्हानिहाय मतदान



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी माहिती दिली. दरम्यान, देशभरात सात टप्प्यात हे मतदान होणार असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. चला तर जाणून घेऊया, कोणत्या टप्प्यात कोणता जिल्ह्याची निवडणूक होणार आहे.


काय म्हणाले निवडणूक आयुक्त

मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस.एस.सिंह आणि ज्ञानेश कुमारही हजर होते. 2024 हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केले. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होईल.


जाहिरात



देशभरात 7 टप्पात होणार मतदान



देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिला तर 20 मे रोजी शेवटचा टप्पात महाराष्ट्रात मतदान होणार आहे.


महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान?

टप्पा

दिनांक

मतदार संघ

पहिला टप्पा

19 एप्रिल

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा

टप्पा

26 एप्रिल

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा

7 मेरायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा

13 मेनंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा

20 मेधुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदार संघ


मॅपद्वारे जाणून घ्या, कोणत्या टप्प्यात मतदान


महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदार संघ

देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान एकूण 7 टप्प्यांत या निवडणुकांमधून 17 लोकसभेमधील सर्व 543 खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी 78 खासदार महिला आहेत. इकडे महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



2019 च्या निवडणुकीत राज्यातले चित्र कसे होते

महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपला 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, MIM 1 आणि अपक्ष 1 अशा जागा जिंकल्या होत्या. आता भाजप शिवसेना पूर्वीची युती तुटून नव्याने झाली, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे पाहणं महत्वाचं असेल.

--------------------------------------------------

लोकसभा निवडणूक, 46 दिवसांत 7 टप्पे: आचारसंहिता लागू   (हे पण वाचा या लिंक वर tap करा)

--------------------------------------------------

जाहिरात 

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtra-lok-sabha-election-2024-result-dates-schedule-updates-132729679.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=132729679&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXT8ksq0zUzdXLzNP3Tw9MC%2FQu9TTwSAIAM%2FvP4h4AAAA%3D

या बातमीचे प्रायोजक आहे.   KEY INTERNER SERVICES

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post