Khandesh Darpan 24x7

महाराष्ट्राच्या यादीत चालले नाही धक्कातंत्र; 13 खासदार कायम:राज्यातील 20 उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर





खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. २०१९ मध्ये राज्यात भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या, त्यातीलच १९ जागांवरच उमेदवार जाहीर झाले. १३ खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली, तर ७ ठिकाणी नवे पण अपेक्षित चेहरे देण्यात आले. विशेष म्हणजे २५% (५) महिला उमेदवार आहेत.जिथे विजयाची हमी तिथे नवा चेहरा देण्याचा प्रयोग मोदी- शाह यांनी अनेक राज्यांत केला. महाराष्ट्रात मात्र तो धोका पक्षाने पत्कारला नाही. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील या केंद्रीय मंत्र्यांना, तर राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही पक्षाने निवडणुकीत उतरवले आहे. त्यांना पक्षाने चंद्रपूरमधून तिकीट दिले. २०१९ मध्ये इथे भाजप पराभूत झाला होता. विद्यमान खासदार असलेल्या ४ जागांवरील उमेदवार मात्र गुलदस्त्यातच आहेत.


जाहिरात



छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिंदे गट दावा साेडेना

अमित शाह यांनी संभाजीनगरात भाजपच लढणार असल्याचे जाहीर करूनही अद्याप या जागेचा तिढा सुटला नाही. शिंदेसेनेने जागा न सोडण्यासाठी दबाव वाढवल्यामुळे संभाजीनगरचा उमेदवार भाजप जाहीर करू शकलेला नाही.​​​​​​​


उद्धवसेनेच्या खासदाराला भाजपने लावले गळाला

भाजपच्या दुसऱ्या यादीत ९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ७२ नावे आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकातील धारवाडमधून, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हावेरीमधून, तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे कर्नालमधून लढतील. दादरा नगर हवेलीतून उद्धवसेनेच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपने उमेदवारी दिली.​​​​​​​


जाहिरात 

जागांचा पेच सुटेना, शिंदे - दादा गटही स्वतंत्र यादी जाहीर करणार

महायुतीतील जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. भाजपचा ३० हून अधिक जागांवर दावा कायम आहे. पण एकनाथ शिंदे व अजितदादा यांना तो मान्य नाही. दिल्लीत अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतरही त्यातून तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद झडत अाहेत. परस्पर उमेदवारीही जाहीर केली जात आहे. त्यामुळे भाजपने हक्काच्या मतदारसंघातील उमेदवार सर्वात आधी जाहीर करुन टाकले. आता शिंदेसेना व अजितदादा गटही स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. उर्वरित जागांवरील वाद मिटल्यानंतरच महायुतीचे अंतिम जागावाटप जाहीर केले जाऊ शकते.


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



९ मराठा, ५ ओबीसी, एक ब्राह्मण उमेदवाराचे नाव

भाजपच्या यादीत ९ (४५%) उमेदवार मराठा, ओबीसी समाजाचे ५ (२५%), अनुसूचित जमातीचे (आदिवासी) २ (१०%) तसेच ब्राह्मण, अनुसूचित जाती (एससी) समाजाचा प्रत्येकी एक, मुंबईतील २ अमराठी भाषिक उमेदवार आहेत.​​​​​​​


महाराष्ट्रात फारसे बदल नाहीत

मुंबईबाहेर महाराष्ट्रातील १८ पैकी १३ उमेदवार कायम ठेवले. फक्त ५ बदलले. पुण्यात गिरीश बापटांचे निधन झाल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना, अकोल्यात संजय धोत्रे आजारी असल्याने त्यांच्या मुलास उमेदवारी.​​​​​​​


बदल का? : बापट यांचे निधन झाल्याने नव्या चेहऱ्याला संधी

उत्तर मध्य मुंबई, सोलापूर, गडचिरोली व भंडारा या चार मतदारसंघांत भाजपचे खासदार असूनही तेथील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.​​​​​​​


मुंबईत दोघांचे तिकीट का कापले?

उत्तर मुंबई या सुरक्षित जागेवर मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी. गोपाळ शेट्टींचे तिकिट कापले. उत्तर-पूर्व मुंबई येथून मनोज कोटकांवर नाराजी. इथे गुजरातींचा प्रभाव म्हणून मिहिर कोटेचा या गुजराती नेत्याला संधी.


पंकजा मुंडेंना संधी का?

२०१९ च्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर भाजपने दुर्लक्षित ठेवलेे. मात्र आता ओबीसींची, विशेषत: वंजारी समाजाची नाराजी नको म्हणून बीडमधून उमेदवारी. ६ ते ८ लोकसभा मतदारसंघांत वंजारी मतदार निर्णायक.​​​​​​​

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtras-list-did-not-work-13-mps-retained-names-of-20-candidates-from-the-state-announced-by-bjp-132718738.html

भाजपकडून कुणाला नव्याने संधी, कुणाचा झाला पत्ता कट   (हे पण वाचा या लिंक वर tap करा)


या बातमीचे प्रायोजक आहे.   KEY INTERNER SERVICES

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم