प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरातील कोचुर रोडवर रविंद्र बेंडाळे याचे शेतात शेत मजुराकरिता बांधलेल्या घरात त्यांच्या कडे काम करीत असलेला सुभाराम बारेला रा. आंबळी ता. झिरण्या जि. खरगोन (मध्यप्रदेश) हा राहत होता. दि. ३० रोजी सकाळी सुभाराम कामावर आला नाही म्हणुन शेत मालकाने सुभाराम याची चौकशी केली असता शेतातील घरात त्याचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन झाल्याचे आढळुन आले त्यावरुन लोकेश बेंडाळे याचे फिर्यादीवरुन सावदा पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं ६३ / २०२४ भा.द.वि क ३०२ प्रमाणे अज्ञात गुन्हेगारा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि जालिंदर पळे व पथकाने धाव घेऊन तेथील परिस्थीची पाहणी करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवुन आजुबाजुच्या परीसरातील सालगडी म्हणुन काम करणारे सर्व मजुरांची माहिती घेतली त्यावरुन दोन सालगडी त्यांचे कामाचे व राहण्याचे ठिकाणी मिळुन आले नाहीत त्यावरुन त्याची माहीती घेण्यास सुरवात केली असता त्यांनी त्यांचे मालकाकडुन सकाळीच रोजदारीचे पैसे घेऊन गेल्याचे समजल्याने चार वेगवेगळी पथक निर्माण करुन सदरचे संशयित शेत मजुराचे नातेवाईक यांचा शोध घेत असताना त्यातील एकाचे नातेवाईक उदळी गावाचे हद्दीत राहत असल्याचे समजले त्याठीकाणी पोलीस पथक गेले व संशयिताना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली घटना सांगितली.
प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत व आरोपी याच्यात झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी नामे सुकलाल रतन लोहारे रा. नेपानगर (म.प्र.) व अर्जुन मुन्ना आवासे रा. बऱ्हाणपुर (म.प्र.) यानी मृतास झोपेत असताना डोक्यामध्ये दगड टाकुन त्याचा खुन केल्याचे निष्पन झाले आहे. याबाबत गुन्ह्याचे कारणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
जाहिरात
सदर गुन्ह्याच्या तपासात महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक जळगाव, अशोक नखाते, अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव, राजकुमार शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर उप विभाग मुक्ताईनगर याचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे जालिंदर पळे सहा. पोलीस निरिक्षक यांनी पोउपनि अमोल गर्जे, सफी, संजय देवरे, विनोद पाटील, यशवंत टहाकळे, देवेंद्र पाटील, विनोद तडवी, प्रकाश जोशी, किरण पाटील याचे पथक तयार करुन गुन्ह्याबाबत कोणत्याही प्रकारची माहीती घटनास्थळावर उपलब्ध नसतानाही वरील प्रमाणे त्वरीत हालचाल व चौकशीकरुन चार तासाचे कालावधीत आरोपीस निष्पन केले व त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा कडिल अधिकारी व पो. अंमलदार, अंगुली मुद्रा तंज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक यांनी तपासकामी मदत केली आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment