पत्रकार बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक १६ मार्च २०२४ रोजी पुण्यातील VIP बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजे दरम्यान पत्रकार संघांचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून अधिवेशनास उत्तर महाराष्ट्र विभागातील पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.
जाहिरात
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या वर्षीचे राज्यस्तरीय अधिवेशन पिंपरी चिंचवड, पुणे येथे घेण्यात येत आहे. या अधिवेशनात 'सध्याची राजकीय सामाजिक परस्थिती' यावर परिसंवादाच्या माध्यमातून विचार मंथन होणार आहे. तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान करून त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न होणार आहे. शनिवार, दिनांक १६ मार्च २०२४ रोजी आहेर VIP बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात सकाळी उद्घाटन सोहळा, दुपारी परिसंवाद व भोजन आणि सायंकाळी ४ वाजता विशेष पुरस्कार सोहळा होणार आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
तरी उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महानगर, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा यांनी केले आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे. GLAMOUR TOUCH Bridal Studio
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
إرسال تعليق