Khandesh Darpan 24x7

भाजपकडून कुणाला नव्याने संधी, कुणाचा झाला पत्ता कट

बीड, जळगाव, मुंबईत धक्कातंत्र; जाणून घ्या, जिल्हानिहाय उमेदवाराचे नाव



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील एकूण 72 उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली असून यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. यात भाजपकडून अनेक विद्यमान खासदारांना धक्कातंत्र देण्यात आले आहे. तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देखील देण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया, कोणाला मिळाली संधी व कुणाचा झाला पत्ता कट.


या उमेदवारांना नाकारली उमेदवारी

भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्याने, त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे.


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



जळगावात भाजपचे धक्कातंत्र

जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे. जळगावात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आहे. या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच मानला जातो. असं असलं तरी आगामी काळात काय निकाल येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणाकोणाला मिळाली नव्याने संधी 20 उमेदवारांच्या यादीमध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अकोल्यातून अनुप धोत्रे, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जळगावमधून स्मिता वाघ, उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा या उमेदवारांना नव्याने संधी देण्यात आली आहे. तर अन्य ठिकाणी विद्यमान खासदारांनाच तिकीट देण्यात आलेले आहे.


जाहिरात 

मराठवाड्यात मुंडेंना नव्याने संधी

मराठवाड्याचा विचार केला तर प्रामुख्याने बीडमधून प्रीतम मुंडे यांना नव्याने संधी मिळाली आहे. तर नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांना व लातूरमधून सुधाकर श्रुंगारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.


महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी

  1. चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
  2. रावेर - रक्षा खडसे
  3. जालना- रावसाहेब दानवे
  4. बीड पंकजा मुंडे
  5. पुणे- मुरलीधर मोहोळ
  6. सांगली - संजयकाका पाटील
  7. माढा- रणजीत निंबाळकर
  8. धुळे - सुभाष भामरे
  9. उत्तर मुंबई- पियुष गोयल
  10. उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
  11. नांदेड- प्रतापराव चिखलीकर
  12. अहमदनगर- सुजय विखे पाटील
  13. लातूर- सुधाकर श्रृंगारे
  14. जळगाव- स्मिता वाघ
  15. दिंडोरी- भारती पवार
  16. भिवंडी- कपिल पाटील
  17. वर्धा - रामदास तडस
  18. नागपूर- नितीन गडकरी
  19. अकोला- अनुप धोत्रे
  20. नंदुरबार- डॉ. हिना गावित

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/lok-sabha-election-bjp-candidate-list-maharashtra-pankaja-munde-pritam-munde-nitin-gadkari-132716110.html

या बातमीचे प्रायोजक आहे.   KEY INTERNER SERVICES

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم