प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर वनस्पतीशास्त्र विषय घेतलेल्या तृतीय वर्ष व एम. एस्सी. विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक २६ ते २९ फेब्रुवारी दरम्यान पंचमढी मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सहली दरम्यान चौरागड, बडा महादेव, छोटा महादेव, जटाशंकर, डाऊन फॉल, लिटल फॉल, राजेंद्र गिरी, ग्रीन व्हॅली व बी फॉल अशा अनेक स्थळांना भेट देऊन अभ्यासक्रमामधील व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध वनस्पतींचे निरीक्षण केले व त्यांची विशेषता जाणून घेतली.
प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे सर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून सहली दरम्यान अभ्यासलेल्या वनस्पती विषयी माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे व विभागांचे अभिनंदन केले.
सदर सहलीत विभाग प्रमुख प्राध्यापक डी. आर. तायडे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. सरला तडवी, प्रा. शिवाजी मगर, प्रा. आदिती डाके, प्रा. मंदार सर, प्रा. चेतना मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री आर. आर. जोगी श्री संतोष तायडे व सौरभ नेमाडे यांचे सहकार्य मिळाले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment