Khandesh Darpan 24x7

सावदा ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नाव द्यावे मुख्यमंत्र्यांना मागणी - राजेंद्र चौधरी मा. नगराध्यक्ष सावदा



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सावदा नगरपरिषद संचलित रूग्णालय सन २०१० मध्ये वैद्यकिय अधिकारी हे पद शासनाने व्यपगत केल्याने बंद करण्यात आले होते. तत्पूर्वी सावदा नगरपरिषदेने सन २००१ मध्ये नगरपरिषद संचलित रूग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय असे नामकरण करण्यात आलेले होते. सदरील रुग्णालय सन २०१० मध्ये बंद करणेत आले होते. त्यामुळे सावदा शहरातील नागरीक आरोग्य विषयक सेवापासून वंचित राहिल्याने शासनाकडे ग्रामिण रुग्णालयाची मागणी करणेत आली.


जाहिरात 



शासनाने सावदा नगरपरिषदेकडील रुग्णालयाची जागा हस्तातरण करणेचे अटीवर ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेले आहे. त्यावेळेस सावदा नगरपरिषदेने नगरपरिषद रूग्णालयाची जागा हस्तातरण करणेबाबत ठराव करून शासनास विनामुल्य वर्ग केलेली आहे. सदरील ठरावात जागा वर्ग करतांना रुग्णालयाचे नांव राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय असेच ठेवावे या अटीवर जागा हस्तातरण केलेली आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, जळगांव यांचेकडे सावदा ग्रामीण रुग्णालयास "राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय" नांव देणेबाबत अर्ज सादर केलेला होता. त्या अर्जावर सबंधीत कार्यालयाकडून सावदा नगरपरिषदेकडे चौकशीसाठी अहवाल मागविण्यात आला त्या अहवालात सावदा नगरपरिषदेने नगरपरिषद अध्यक्ष व नगरपरिषद सदस्य यांनी जागा हस्तांतरीत करतेवेळी पूर्वी नगरपरिषद दवाखान्यास असलेले राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय असे नाव देण्यात यावे असा संमत करण्यात आलेला ठराव कार्यालयाकडे सादर केलेला आहे. तरी बराच कालावधी होवून सुध्दा आजपावेतो नांव देणे संदर्भात कार्यवाही केलेली नाही.



जाहिरात 

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


त्यामुळे वरील प्रकरणी सावदा मा. नगराध्यक्ष राजेंद चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जळगांव व उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक मंडळ, नाशिक यांचेकडे पत्र व्यवहार केला परंतु त्यांनी त्यास शासनाचे नवीन धोरणाप्रमाणे नवीन शासकिय इमारतीस कुठलेही नांव देता येत नाही असे उत्तर दिलेले आहे. परंतु सदरील रुग्णालयाचे नांव जुनेच आहे. तसेच जागा हस्तातरणावेळी राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय हे नांव कायम ठेवणेबाबत नगरपरिषदेचा ठराव झालेला आहे. असे असतांना सुध्दा नवीन शासकिय धोरणाचे कारण देवून राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय हे नांव देण्यास सबंधीत अधिकारी टाळाटाळ करीत असलेचे दिसून येत असल्याने त्यांनी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडे धाव घेतली असून सदरील रूग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय हे नांव देणेबाबत सबंधीत अधिकारी यांना आदेश व्हावेत हि विनंती केलेली आहे.




जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post