Khandesh Darpan 24x7

घर खर्चातील पैसै वाचवून संभाजीनगरची महिला बनली उद्योजिका

यशोगाथा:

घर खर्चातील पैसै वाचवून संभाजीनगरची महिला बनली उद्योजिका; इंटरनेटवर प्रशिक्षण घेत ऑनलाईन स्टोअर





खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   

वेळ आणि परिस्थिती कधी बदलेल हे कुणालाच माहित नाही. मात्र, एका सीमेपर्यंत आमच्या जीवनाची दशा आणि दिशा यावर निर्भर करते की, आम्ही खराब परिस्थितीचा सामना कसे करतो. छत्रपती संभाजीनगरातील 'फैजा' यांची व्यावसायिका होण्याची कहानी देखील काहीशी अशीच आहे.


मध्यम वर्गीय 'फैजा' यांचे संपूर्ण शिक्षण छत्रपती संभाजीनगरातच झाले. मजीद एसएशी तिच्या लग्नानंतर, तिने दुबईमध्ये एक नवीन जीवनास सुरुवात केली. दुबईमध्ये असतानाच आपण अजून शिकलो पाहिजे. काही तरी व्यवसाय सुरू केला पाहिजे, असे फैजा यांना वाटू लागले. यातच त्यांनी पतीकडून मिळणाऱ्या घरखर्चातील पैसे साठवून 2023 मध्ये ऑनलाईन स्टोअर सुरू केले. आणि मोठ्या प्रमाणात टेक ॲक्सेसरीजची विक्री करत आहेत.


हि  बातमी यांचे सौजन्याने  (दर्शना गावंडे  मो. ८४२१३२८९२४)




काय आहे फैजाचा व्यवसाय?

फैजा यांनी 2023 मध्ये Grunxstore.Com ची स्थापना केली. हे स्टोअर टेक ॲक्सेसरीज आणि जीवनशैली उत्पादने विकतात. विशेषत: फोन आणि घड्याळे यांसारख्या अॅपल गॅझेटसाठी आणि चार्जिंग सोल्यूशन्स यांची विक्री करतात. फैजा यांनी पतीकडून मिळणाऱ्या घरखर्चातील पैसे साठवून हा व्यवयास सुरू केला आहे.



आपल्या देशात मोठी संधी

फैजा म्हणाल्या की, स्त्रियांना पुरुषांइतकाच शिक्षणाचा अधिकार आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना पुरुषांशी स्पर्धा करावी लागेल, ही शर्यत नाही. प्रत्येकाची स्वतःची ताकद असते आणि योग्य शिक्षण आणि मार्गदर्शनाने स्त्रिया त्यांच्या महाशक्तींचा शोध घेऊ शकतात आणि त्यांचा वापर करू शकतात. तर पती-पत्नी दोघांनीही दैनंदिन कामे आणि मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी वाटून घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.



महिला सक्षमीकरण महत्त्वाचे

पुढे बोलताना फैजा म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षण आहे त्याच वेळी त्यांना कुटुंबाचा पाठिंबा आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. तथापि, जगभरातील लाखो मुलींना अजूनही शिक्षणात प्रवेश करण्यामध्ये अडथळे येतात, मग ते सांस्कृतिक नियम, गरिबी किंवा संसाधनांच्या अभावामुळे असोत. 


या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, प्रत्येक मुलीला दर्जेदार शिक्षण मिळण्याची संधी मिळेल याची खात्री करण्यासाठी आपण पुन्हा वचनबद्ध होऊ यात असे त्यांनी म्हटले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये मोठी संधी आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.   GLAMOUR TOUCH Bridal Studio

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/muslim-woman-success-story-international-womens-day-special-132686923.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=132686923&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXT8ksq0zUzdXLzNM3TPKK8g8LzvXxSAIAM1bW4B4AAAA%3D

Post a Comment

أحدث أقدم