प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
श्री यमुनेश्वर महादेव मंदिर सावदा प्राचीन व स्वयंभू मंदिर असून साधारण दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी सावदा येथील देशमुख यांचे पूर्वज यांनी सध्या असलेल्या मंदिराच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी खोदकाम करीत असताना स्वयंभू महादेवाची काळया पाषाणाची पिंड आढळून आली म्हणून त्या वास्तूवर स्वतः राहण्यासाठी बांधकाम न करता मंदिराची उभारणी केली. त्या काळापासून रामचंद्र माधव ओवे यांनी वैदिक शिक्षण घेतलेले असल्याने आणि देशमुख यांच्या देवघराची पूजाआर्चा ओवे परिवारा मार्फत होत असल्याने यांची देशमुख यांनी वही वाटदार व पुजारी म्हणून नेमणूक केली.
त्यानंतर पुढील पिढी साधारण 1960 पासून कै. राजाभाऊ ओवे यांनी दर महाशिवरात्रीला श्रींस लघुरुद्राचा महाअभिषेक सुरू केला. (महाअभिषेक वेदमूर्ती पाठक गुरुजी व सहकारी यांच्या पौरोहित्य खाली होत असे.) सदर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्र वैकुंष्ठ चतुर्दशी व त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव संपन्न होतो पुढील काळात सन 2011 ते 2023 या काळात काही शशिकांत दिनकर उर्फ राजाभाऊ ओवे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सिंहाचा वाटा उचलला व या कार्यासाठी समाजातून स्वयंप्रेरणेने या मंदिर उभारणी सहकार्य केले.
सन १९७४-७५ या काळात पूर्णवादाचार्य गुरुवर्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे या मंदिर परिसरात वास्तव्य राहिलेले आहे.
मागील परंपरेनुसार अव्याहात श्रींची सेवा अभिषेक पूजाअर्चा, पारायण, कीर्तन, भजन, अभ्यासवर्ग, अभिषेक पूजाअर्चा मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नित्य व नैमित्य सुरू असते.
श्रावण महिन्यात दररोज श्रींना रुद्राभिषेक करण्यात येतो. श्रावण महिन्यात भाविक भक्तांची गर्दी दर्शनासाठी उसळते मंदिराच्या प्रवेशद्वाराला वेदमूर्ती प्रल्हाद गुरु पारनेरकर महाद्वार असे नाव देण्यात आले आहे.
महाद्वाराला नाव देण्यामागील इतिहास असा सुमारे 1880 च्या काळात वेदमूर्ती प्रल्हाद गुरु वय वर्ष 8 हे वेद विद्याग्रहण करण्यासाठी पारनेरकर इथून इंदोर येथे जाण्यासाठी पायी प्रवासास निघाले होते (इंदोर वेद वेद्यांचे माहेरघर आहे) पायी प्रवास करत असताना त्यांनी मनमाड, भुसावळ, सावदा, रावेर या मार्गे इंदोर गाठले होते. असा सुमारे चार महिने प्रवास करून इंदोर येथे 18 वर्षे सतत 18 तास दररोज वेद अध्ययन करून वेदमूर्ती प्रल्हाद गुरु हे दश ग्रंथी झाले. इतक्या लहान वयात महादेवाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात आलेल्या संघर्षास ते उत्तम रीतीने सामोरे गेले. मनुष्य जीवनात संघर्ष अटळ असल्याने त्याचा सामना योग्य पद्धतीने करता येणे साठी मनुष्यांस देवाची कृपा व आदर्श व्यक्ती समोर असावा लागतो.
व्हिडीओ लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या बातमीचे प्रायोजक आहे. GLAMOUR TOUCH Bridal Studio
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment