बलवाडी प्रतिनिधी
बलवाडी खिर्डी रस्त्यावर बलवाडी गावापासून वळण रस्त्याच्या पुढे एक ते दिड कि. मी. पर्यंत गेल्या पाच सहा दिवसापासून पडलेल्या खळीमुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत. अत्यंत खराब व खड्डेमय झालेल्या या रस्त्यावरुन वाहन चालवतांना वाहनधारकांना चालवतांना कसरत करावी लागत आहे.
सदरच्या रस्त्यावर खडीचे ढिग पडलेले असून कोपरी खडी, दगड पसरल्याने दुचाकी सरकून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. त्यातच बलवाडीहून निंभोरा मार्गे जायचे निंभोरा येथील रेल्वे गेट फाटक क्रमांक 167/3-E हे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या परवानगीने भुयारी (सबवे) करण्यासाठी दिनांक १० एप्रीलपासून ते दिनांक ३० जून पर्यंत दोन महिने बंद असल्याने सर्व वाहनधारक हे याच रस्त्याने जा ये करत असून पडलेल्या व पसरलेल्या खळीच्या ढिगांमुळे या रस्त्यावर मोठे ट्राफीकही होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व इतर वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
मोठया तसेच लहान वाहनांची अवस्था खिळखिळी होत असून टायर पंक्चर होऊन मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत आहे. या सर्व प्रकाराकडे मात्र संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देवून समस्या सोडवावी अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्था कडुन होत आहे.
إرسال تعليق