Khandesh Darpan 24x7

राज्यात सर्वाधिक तापमान 'या' शहरात; जाणून घ्या मुंबई आणि पुण्याचं तापमान

राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. राज्यातील बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान.



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली असून, या सर्व राज्यांचे सरासरी तापमान ४१ अंशांवर गेले आहे. गेल्या २४ तासात जळगावचे तापसान ४३.२ अंश सेल्सिअसवर गेल्याने ते राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरचे आजचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस तर परभणीचे तापसान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.


राज्यातील बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तापमानातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  



आजचं मुंबईत तापमान किती? 


महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील विविध शहरांत पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. आजचं मुंबईतील कुलाबा येथे तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर सांताक्रुझ येथे ३४.४ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.



आजचं पुण्याचं तापमान किती? 


गुरुवारी पुण्याचं तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. बुधवारी पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यानंतरही दुसऱ्या दिवशी तापमानाने चाळिशी पार केली आहे.



महाबळेश्वर-माथेरानही तापू लागले -


थंड हवेमुळे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर व माथेरानही तापले आहेत. पारा ३३.२ अंशांवर पोहोचला आहे. अंगातून घामाच्या धारा लागत आहे. उकाडा कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत भलामोठा मांडव घातला आहे. सकाळी साडेअकरा ते चार वाजेपर्यंत ३३ अंश तर सध्याकाळी पाचनंतर सायकाळी २० अंशापर्यंत जात आहे. माथेरानचे तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.



राज्यातील प्रमुख शहराचं तापमान खालील प्रमाणे – 


जळगाव - ४३.२ अंश सेल्सिअस

छत्रपती संभाजीनगर -४२.२ अंश सेल्सिअस

बीज- ४२.२ अंश सेल्सिअस

पुणे - ४१ अंश सेल्सिअस

रत्नागिरी - ३३.६ अंश सेल्सिअस

सोलापूर -४२.० अंश सेल्सिअस

परभणी -४२.५ अंश सेल्सिअस

महाबळेश्वर - ३३.२ 

कुलाबा -३३.२

सांताक्रुझ -३४.४

उदगीर -३९.०

सातारा - ३९.२

धााराशीव - ४१. २

कोल्हापूर - ३८.८

नाशिक -४०.७

डहाणू -३५.०

सांगली - ३८.६

अलिबाग -३४.०

माथेरान -३६.०

जालना -४१.० 


या बातमीचे प्रायोजक आहे.   KEY INTERNER SERVICES

जाहिरात 


सहप्रायोजक आहे.
आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Apr 18, 2024, 11:54 PM IST   https://marathi.hindustantimes.com/amp/maharashtra/weather-update-temperature-mercury-in-maharashtra-heat-intensity-increased-mercury-43-in-jalgaon-141713464260529.html


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم