निंभोरा प्रतिनिधी : परमानंद शेलोडे
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कुल चा विद्यार्थी अविनाश विजयकुमार सोनार हा दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर धनश्री संदीप चौधरी ही ८९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
अविनाश
सोनार हा विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते विजय सोनार यांचा मुलगा तर सेवानिवृत्त
ग्रेडेड मुख्याध्यापक रमाकांत सोनार यांचा नातू आहे. यशस्वीतांना शाळेचे
मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
जाहिरात
Post a Comment