प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
ई – श्रम कार्ड काढून असंघटीत कामगारांची नोंद शासनदरबारी केली जाते जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बारा बलुतेदार काम करणारे जसे लोहार, सुतार, गवंडी, विटभट्टा कामगार, रिक्षावाले, भाजीपाला विक्री करणारे, बांधकाम कामगार, हमाल, घरकाम कामगार महिला, शेतमजूर, साफ – सफाई करणारे कामगार, फेरीवाले, मच्छिमार करणारे, वेल्डर - फिटर, वायरमन, सुतकाम हाथकाम करणारे कामगार, विणकाम - बारदान करणारे कामगार, दुकानाचे कामगार ज्यांचे ई - पी. एफ. मध्ये समावेश नाही असे कामगार व इतर असंघटीत घटकात समाविष्ठ असलेले सर्व प्रकारचे कामगार ज्यांनी ई- श्रम कार्ड धारण केलेले आहे.
अशा कामगारांसाठी शासनाने अपघाती रु. २ लाखचा विमा लागू केला आहे. त्याचं कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २ लाखाचा विमाचा लाभ ई- श्रम कार्ड धारकांना मिळेल अशी योजना शासनाने सुरु करावी घरातील कामकर्ता व्यक्तीच्या निधनामुळे घराचा आधारस्थंभ जातो ते कुटंब उभे राहणे साठी सदरहू विमा कवच सुरु करावे. तसेच असंघटीत कामगारांचे वय ६० वर्षे झाल्यावर त्यांना वृद्धपन येते त्यांच्याने कोणत्याही प्रकाराचे जडकाम करता येत नाही त्याचे आरोग्य चांगले राहत नाही.
त्यावेळेस त्यांना आधाराची गरज असते म्हणून शासनाने ई- श्रम कार्ड धारण केलेल्या असंघटीत कामगारांसाठी ६० वर्षे नंतर महिला - पुरुषांना श्रावणबाळ योजनेत सरसकट समावेश करून त्यांना श्रावणबाळ योजनेची पेंशन लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार विजेते तथा श्री. गुरुदत्त बहु. संस्था, कांचन नगर, जळगावचे अध्यक्ष राजेंद्र कोळी यांनी मुख्यमंत्री, म. रा. मुंबई, कामगार कल्याण मंत्री, मुंबई, सचिव- कामगार कल्याण म. रा. मुंबई, जिल्हाधिकारी, जळगाव, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव. यांचे कडे केली आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे. KEY INTERNER SERVICES
إرسال تعليق