Khandesh Darpan 24x7

ब्राह्मण हितवर्धिनी संस्थेच्या अध्यक्ष पदी सचिन सकळकळे तर उपाध्यक्ष पदी प्रदीप कुलकर्णी



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा येथील ब्राह्मण हितवर्धीनी या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा विलास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्या सभे मध्ये सचिन सकळकळे यांची संस्थेच्या अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी प्रदीप कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

सदर संस्था सावदा आणि परिसरातील ब्राह्मण समाजाच्या उन्नती साठी त्यांच्या प्रश्नासाठी गेल्या ४५ वर्षांपासून काम करीत आहे. खेळी मेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेत संस्थेच्या कोषाध्यक्ष पदी सानिका मटकरी तर सचिव पदावर रविंद्र कुलकर्णी यांची अविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या इतर संचालकांमधे किरण कुलकर्णी, दिपक कुलकर्णी, संतोष जोशी, रितेश सकळकळे, कविता सकळकळे, श्रीकांत मटकरी, धनश्री कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी तर स्वीकृत सदस्य पदी निलेश कुलकर्णी आणि सतिष जोशी यांची निवड करण्यात आली. 

 

ज्या प्रमाणे आज पर्यंत या अगोदरच्या कार्यकारिणीने संस्थेच्या आणि समाजाच्या हितासाठी काम केले तसेच आम्ही यापुढेही करत राहू असे प्रतिपादन संस्थेचे नूतन अध्यक्ष सचिन सकळकळे यांनी केले. सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन राजेंद्र जोशी यांनी केले. 






या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post