प्रतिनिधी : राज चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा, ता. रावेर येथून जवळील चिनावल येथे साप्ताहिक 'आवाज परिवर्तनाचा' चे संपादक हे भुसावळ येथे होणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी चिनावल येथील बैठक आटोपून गुरुवारी, २ मे रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास सुझुकी इको (क्र. एमएच १९ एएक्स १४३०) या चार चाकी वाहनाने परत येत होते. तेव्हा चिनावल- कोचूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ अज्ञात बाईक स्वारांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, अशी फिर्याद 'आवाज परिवर्तनाचा' चे जखमी झालेले संपादक, तसेच शिक्षक तथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आत्माराम तायडे (रा. सावदा, ता. रावेर) यांनी शुक्रवारी ३ मे रोजी सावदा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन अज्ञात हल्लेखोराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथा स्तंभावर हल्ला होय. तरी या वरील प्रकरणातील हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा पत्रकार उपोषण करतील. असे निवेदन आज ताप्ती सातपुडा जनलिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष शाम पाटील यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे प्रभारी ए.पी.आय. हरिदास बोचरे यांना दिले आहे.
या निवेदनावर जितेंद कुलकर्णी, रविंद हिवरकर, शेख फरीद शेख नुरोद्दीन, युसुफ शहा सुपडू शाह, राजेश चौधरी, दिवक श्रावगे, साजिद शेख बाबू आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment