प्रतिनिधी : राज चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरातील बस स्थानकाच्या मागील बाजूला सुरू असलेल्या पत्र्याच्या शेड मागील जुगार अड्डयावर सावदा पोलिसांनी रेड टाकून नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भातील सविस्तर याप्रमाणे, सावदा शहरातील बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती सावदा पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने सावदा पोलिसांच्या पथकाने शनिवार दुपारच्या सुमारास वरील स्थळी छापा टाकला असता या छाप्यामध्ये
संजय लक्ष्मण चौधरी (वय ५०, रा. स्वामीनारायण नगर, सावदा);
रोहित चंद्रकांत सन्यास (वय २३, रा. आंबेडकर नगर, सावदा );
तस्मली रशीद तडवी (वय ४२, रा. काझीपुरा, सावदा);
सुनील धनराज चौधरी (वय ४३, रा. भोईवाडा, सावदा );
अशोक प्रल्हाद खुर्दे (वय ४५ रा. विवरा );
संदीप कोळी (रा. कोचूर);
विशाल कोळी (रा. सावदा);
बबलू कासार (रा. सावदा);
इरफान शेख उर्फ इम्मो (बडा आखाडा, रा. सावदा)
यांच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत ₹. ११२०० रोख, ₹ १,९०,००० किमतीच्या चार मोटारसायकल आणि ₹ ११,५०० किमतीचे चार मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
Post a Comment