बलवाडी प्रतिनिधी
दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयात सन १९९८-९९ च्या
वर्गातील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रमाचे २५ वर्षांनंतर आयोजन करण्यात
आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. एच. पाटील हे होते.
यावेळी आपल्या शालेय जीवनातील मैत्री हा एक आयुष्याचा ठेवा
मानला जातो. या शालेय जीवनातील आठवणी सतत मनात घोंगावट असतात. अशा परिस्थितीत अनेक
वर्षानंतर एकत्र येऊन भेटले तर जगात मावेनासा आनंद होत असतो. हा एक आनंदाचा क्षण
म्हणजे स्नेह मेळावाच असतो.
या स्नेह मेळाव्यात विद्यार्थी - विद्यार्थिनी एकत्र येऊन आपल्या
जीवनातील आठवणींना उजाळा देत सर्व मित्र-मैत्रिणी आपण कोण कोणत्या
क्षेत्रात व कोठे राहतो, काय व्यवसाय करतो, कुठे नोकरी करतो, अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपला
परिचय स्नेह मेळाव्यात दिला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस. जी. महाजन, उपमुख्याध्यापक आर. एल. तायडे, शिक्षक , शिक्षिका, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती
होती. कार्यक्रम संपल्यावर स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन शालिनी चौधरी या माजी विद्यार्थीनीने केले.
माजी
विद्यार्थीनी उशा कोळी हिने शाळेतील आठवणींना उजाळा देत “शाळा ही आई वडीलांनंतर संस्काराची
शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते.” याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे
दहावीच्या बोर्डाच्या पेपरच्या वेळेस तिचे ओळखपत्र हरवले असता मनात खूप भीती असून रडू कोसळले त्यावेळेस
पी. टी. महाजन यांनी केलेल्या मदतीला उजाळा दिला.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
Post a Comment