Khandesh Darpan 24x7

कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून अक्षय चौधरी MS in CS परीक्षेत विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


फुलगाव (ता. भुसावल) चे रहिवासी गृहरक्षक दलाचे जवान राम माधव चौधरी आणि सू. रा. कदम विद्यामंदिर वरणगाव येथील उपशिक्षिका रेखा राम चौधरी यांचे सुपुत्र अक्षय चौधरी यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (एम. एस. इन सी. एस.) च्या परीक्षेत ४ पैकी ३.८ (GPA) गुण मिळवत विशेष प्राविण्य (First class with Distinction) मिळवून यश संपादन केले आहे. 



 

अगदी प्राथमिक वर्गापासून ते विद्यालय तसेच महाविद्यालयीन शिक्षणात अक्षय जिद्दीने यशाची शिखरे पार करीत गेला. अक्षय चे प्राथमिक शिक्षण सु. रा. कदम प्राथमिक विद्यामंदिर, वरणगाव येथे तथा माध्यमिक शिक्षण गंगाधर सांडू माध्यमिक विद्यालय, वरणगाव येथे पार पडले. तर उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे तथा इंजीनियरिंग सिंहगड अकॅडमी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे झाले. 


 


अक्षयला अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच संगणक शिक्षणाची आवड होती सन २००७ च्या सुमारास क्रिस्टल कॉम्प्युटर्स, वरणगाव या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून अक्षय ची खऱ्या अर्थाने प्राथमिक संगणक शिक्षणाची सुरुवात  झाली. 


 

या घवघवीत यशाबद्दल अक्षय चौधरी वर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post