Khandesh Darpan 24x7

फैजपूर येथे 'लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा अन्वयार्थ' विषयावर चर्चसत्र चे आयोजन



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर आणि असोसिएशन फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च अँड ट्रेनिंग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 जून 2024 रोजी लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा अन्वयार्थ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले.



यावेळी ऑनलाईन वेबीनारच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. आर. बी वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर तर प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. श्रीरंजन आवटे,  राज्यशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे हे होते.


जाहिरात 



मा.डॉ. श्रीरंजन आवटे यांनी २०१४ पासून तर २०२४ पर्यंतच्या सर्व निकालांचे विश्लेषण केले. त्यांनी आपल्या भाषणात लोकसभा २०२४ च्या निकाला्चे विश्लेषण करतांना ही निवडणूक ऐतिहासिक असून सामान्य स्वरूपाची नसल्याचे सांगितले. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या निकालाने एकपक्षीय वर्चस्वाला खिंडार पाडली. संविधान बचाव, बेरोजगारी, महागाई, शेतमालास भाव हे मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे ठरले असून महाराष्ट्र व उत्तरप्रदेशच्या मतदारांनी वेगळा कल दिला आहे . त्यामुळे या दोन राज्यातून भाजप पक्षाला बॅकफूटला यावे लागले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय अभ्यासपुर्ण उत्तरे त्यांनी दिले.


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेप्रमाणे भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश असून आपण लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकशाहीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी लोकशाहीत लोकांचा सहभाग आणि त्यांच्या मतांचे मूल्य हे निवडणुकीच्या माध्यमातूनच कळते असे मत व्यक्त केले व फैजपूर येथील महाविद्यालयाच्या ऐतिहासीक परंपरेचा परीचय करून दिला.


यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेबिनारचे समन्वयक प्रा. अमोल सातपुते यांनी केले. वक्त्यांचा परीचय प्रा. नितीन नन्नावरे यांनी केला. सुत्रसंचलन डॉ. ताराचंद सावसाकडे आणि आभार डॉ. विठ्ठल चौधरी यांनी मानले. वेबिनारच्या आयोजनासाठी धनाजी नाना महाविद्यालया्चे उपप्राचर्य डॉ. हरीष नेमाडे, प्रा. शिवाजी मगर आणि AISRT चे अध्यक्ष प्रा. तानसेन रणदिवे-पुणे, डॉ. भूपेंद्र घरत-सहसचिव-नागपूर, नितीन नन्नावरे-कोषाध्यक्ष-चाळीसगाव, डॉ. राजू लिपटे-सदस्य- नागपूर, डॉ. अमर बोंद्रे, प्रा.संदिप राहुल-गोंदिया, प्रा. विजय कांदलकर-नागपूर,  डॉ. प्रमोद काणेकर-नागपूर, डॉ.अल्पना वैद्य-नागपूर यांनी परीश्रम घेतले व सहयोगी सदस्य, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक यांनी सहकार्य केले.



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم