Khandesh Darpan 24x7

660 मेगावॅट प्रकल्प दिपनगर येथे पर्यावरणीय मूल्यांकन घटकांचा पर्यावरण अभ्यासक तज्ज्ञ के. पी. चौधरी, राजेंद्र चौधरी यांनी घेतला आढावा


फुलगाव प्रतिनिधी :  युवराज कुरकुरे 


5 जुन 2024 पर्यावरण दिन सप्ताह अंतर्गत  क्षेत्रभेट



राज्याची वाढती लोकसंख्या, मोठेउद्योग, प्रगत शेती यांची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी 660 मेगावॅट औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प प्रिंप्रीसेकम ता. भुसावळ येथे पूर्णत्वास येत आहे.



तत्पूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग, एसटीपी, ईपीटी, ग्रीनबेल्ट, प्रकल्पबाधीत प्रकरणांचा, वृक्षलागवड पर्यावरणीय घटकांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) बाबत प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचे दालनात सखोल चर्चा करून आढावा घेण्यात आला. 



प्रकल्प क्षेत्र भेट दरम्यान प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन या घटकांची पाहाणी केली. के. पी. चौधरी, राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी संबधीत जबाबदार प्रमुख अधिकारी यांना अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून त्यांचे म्हणणे जाणून वीजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्प व्हावा अशी परिसरातील शेतकरी, जनतेची आमची इच्छा आहे परंतु प्रकल्प पूर्णत्वास येण्याआधी प्रकल्पबाधीत गावातील सामान्य जनतेला जे प्रदूषणाचे चटके सहन करावे लागतात. शुद्ध हवा, मानवी व मानव इतर प्राणी, पक्षी, वनस्पती, लहान मोठे ओढे, भोगावती वेल्हाळा नदी, तलाव एकुण पर्यावरणावर होणारे आघात भरून काढण्यासाठी प्रकल्पा तर्फे सामाजिक दायित्व कामे केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालया तर्फे दिलेल्या गाईड लाईन लक्षात घेत कोळसा व पाण्यावर आधारीत औष्णीक वीज निर्मिती करतांना पूर्ण करणे अपेक्षित आहे. 



पर्यावरण मूल्यांकडे दूर्लक्ष झाल्यास एम. पी. सी. बी. यांचे कडे आम्ही न्याय मागणी करू असे माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी निवेदनातून मागणी केली आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन संस्थेचे सहकार्य प्राप्त झाले. युवराज कुरकुरे उपस्थित होते. या सप्ताह अंतर्गत संस्थे तर्फे आय.आय.टी.एन. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकल्पाला भेट देण्याचे आयोजन करण्यात आले आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post