Khandesh Darpan 24x7

मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना संधी, पाहा यादी



 खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या. त्यानंतर एनडीएने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी महाराष्ट्रातून कोण कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांना होती. एकूण 6 नेत्यांना महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

 

नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना पुन्हा एकदा कॅबिनेट, तर रामदास आठवलेंना पुन्हा एकदा राज्यमंत्रिपद देण्यात आलंय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री करण्यात आलंय. रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.

 

 

नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री

 



2014 आणि 2019 च्या दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी सहभागी होते. रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे.

 

 

पियुष गोयल पुन्हा मोदी सरकारमध्ये

 


2014 आणि 2019 या दोन्ही मंत्रिमंडळात पियुष गोयल केंद्रीय मंत्री होते. रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालय त्यांनी सांभाळलं आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. यापूर्वी राज्यसभेतून संसदेत पोहोचणारे गोयल यंदा उत्तर मुंबई लोकसभा मतदारंसघातून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.


याआधी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी हे निवडून आले होते. पण भाजपानं यंदा धक्कातंत्र वापर त्यांचं तिकीट कापलं. त्यांच्या जागी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली.

 

 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक मंत्रिपद

 


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यांना कॅबिनेट मिळेल की राज्यमंत्रिपद हे अद्याप स्पष्ट नाही.


रक्षा खडसेंच्या रुपाने महाराष्ट्रातून महिला मंत्री



रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्षा खडसे या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहे.

 

 

रामदास आठवलेंचं राज्यमंत्रिपद कायम

 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आठवले यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

 

 

पहिल्यांदा खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ मंत्रिपदी

 


पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून ते संसदेत पोहोचले आहेत.

 

2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे 23 खासदार संसदेत गेले होते. यावेळी मात्र महाराष्ट्रात भाजपची चांगलीच पीछेहाट झाली असून राज्यात भाजपचे नऊ खासदार निवडून आले आहेत.

 

 

मोदींच्या मावळत्या मंत्रिमंडळात भारती पवार (आरोग्य राज्यमंत्री), रावसाहेब दानवे (रेल्वे राज्यमंत्री) आणि कपिल पाटील (पंचायत राज राज्यमंत्री) होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला.

 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असणारा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सात खासदार निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला असला तरी या पक्षाचे राज्यसभा खासदारही आहेत. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने सध्यातरी अजित पवाराच्या पक्षाने इतर मंत्रिपद घेण्यास तुर्तास तरी नकार दिला आहे.

 


मोदी कॅबिनेट 3.0 ची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे -

 

मोदी कॅबिनेट 3.0

NDA सरकारमधील मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी


क्रमांक

पद

नाव

पक्ष

1

कॅबिनेट मंत्री

राजनाथ सिंह

भाजप

2

कॅबिनेट मंत्री

अमित शाह

भाजप

3

कॅबिनेट मंत्री

नितीन गडकरी

भाजप

4

कॅबिनेट मंत्री

जे पी नड्डा

भाजप

5

कॅबिनेट मंत्री

शिवराज सिंह चौहान

भाजप

6

कॅबिनेट मंत्री

निर्मला सीतारामन

भाजप

7

कॅबिनेट मंत्री

डॉ एस जयशंकर

भाजप

8

कॅबिनेट मंत्री

मनोहर लाल खट्टर

भाजप

9

कॅबिनेट मंत्री

पियुष गोयल

भाजप

10

कॅबिनेट मंत्री

धर्मेंद्र प्रधान

भाजप

11

कॅबिनेट मंत्री

सर्वानंद सोनोवाल

भाजप

12

कॅबिनेट मंत्री

डॉ वीरेन्द्र कुमार

भाजप

13

कॅबिनेट मंत्री

प्रल्हाद जोशी

भाजप

14

कॅबिनेट मंत्री

जुएल ओराम

भाजप

15

कॅबिनेट मंत्री

गिरिराज सिंह

भाजप

16

कॅबिनेट मंत्री

अश्विनी वैष्णव

भाजप

17

कॅबिनेट मंत्री

ज्योतिरादित्य सिंधिया

भाजप

18

कॅबिनेट मंत्री

भूपेंद्र यादव

भाजप

19

कॅबिनेट मंत्री

गजेंद्र सिंह शेखावत

भाजप

20

कॅबिनेट मंत्री

अन्नपूर्णा देवी

भाजप

21

कॅबिनेट मंत्री

किरण रिजिजू

भाजप

22

कॅबिनेट मंत्री

हरदीप सिंह पुरी

भाजप

23

कॅबिनेट मंत्री

डॉ मनसुख मांडविया

भाजप

24

कॅबिनेट मंत्री

जी किशन रेड्डी

भाजप

25

कॅबिनेट मंत्री

सी आर पाटील

भाजप

26

कॅबिनेट मंत्री

एच डी कुमारस्वामी

जनता दल (सेक्युलर)

27

कॅबिनेट मंत्री

राम मोहन नायडू

तेलगू देसम पार्टी

28

कॅबिनेट मंत्री

चिराग पासवान

लोक जनशक्ती पार्टी

29

कॅबिनेट मंत्री

जितन राम मांझी

हिंदुस्तानी आवाम मोर्चा

30

कॅबिनेट मंत्री

राजीव रंजन सिंह

जनता दल (युनायटेड)

 

 

 

 

MoS (I)

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

नाव

पक्ष

31

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

इंदरजीत सिंह राव

भाजप

32

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

डॉ जितेंद्र सिंह

भाजप

33

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

अर्जुन राम मेघवाल

भाजप

34

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

प्रतापराव जाधव

शिवसेना (शिंदेगट)

35

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

जयंत चौधरी

राष्ट्रीय लोक दल

 

 

 

 

MoS

राज्यमंत्री

नाव

पक्ष

36

राज्यमंत्री

रक्षा खडसे

भाजप

37

राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ

भाजप

38

राज्यमंत्री

जितिन प्रसाद

भाजप

39

राज्यमंत्री

श्रीपाद नाईक

भाजप

40

राज्यमंत्री

पंकज चौधरी

भाजप

41

राज्यमंत्री

कृष्ण पाल

भाजप

42

राज्यमंत्री

नित्यानंद राय

भाजप

43

राज्यमंत्री

व्ही सोमन्ना

भाजप

44

राज्यमंत्री

प्रा. एस पी सिंह बघेल

भाजप

45

राज्यमंत्री

शोभा करंदलाजे

भाजप

46

राज्यमंत्री

कीर्तीवर्धन सिंह

भाजप

47

राज्यमंत्री

बी एल वर्मा

भाजप

48

राज्यमंत्री

शांतनु ठाकूर

भाजप

49

राज्यमंत्री

सुरेश गोपी

भाजप

50

राज्यमंत्री

डॉ एल मुरुगन

भाजप

51

राज्यमंत्री

अजय टम्टा

भाजप

52

राज्यमंत्री

बंदी संजय कुमार

भाजप

53

राज्यमंत्री

कमलेश पासवान

भाजप

54

राज्यमंत्री

भागीरथ चौधरी

भाजप

55

राज्यमंत्री

सतीश चंद्र दुबे

भाजप

56

राज्यमंत्री

संजय सेठ

भाजप

57

राज्यमंत्री

रवींद्र सिंह बिट्टू

भाजप

58

राज्यमंत्री

दुर्गा दास उईके

भाजप

59

राज्यमंत्री

सुकांता मजूमदार

भाजप

60

राज्यमंत्री

सावित्री ठाकूर

भाजप

61

राज्यमंत्री

तोखन साहू

भाजप

62

राज्यमंत्री

डॉ राज भूषण चौधरी

भाजप

63

राज्यमंत्री

भूपथी राजू श्रीनिवास वर्मा

भाजप

64

राज्यमंत्री

हर्ष मल्होत्रा

भाजप

65

राज्यमंत्री

निमुबेन बंभानिया

भाजप

66

राज्यमंत्री

जॉर्ज कुरियन

भाजप

67

राज्यमंत्री

पवित्रा मार्गेरिटा

भाजप

68

राज्यमंत्री

रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)

69

राज्यमंत्री

रामनाथ ठाकूर

जनता दल (युनायटेड)

70

राज्यमंत्री

अनुप्रिया पटेल

अपना दल (S)

71

राज्यमंत्री

डॉ चंद्रशेखर पेम्मासानी

तेलगू देसम पार्टी

https://www.bbc.com/marathi/articles/cl44dr0zkd0o


या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post