Khandesh Darpan 24x7

लोहारा सुकी नदीचा घाट फोडतो टाहो. कुणीतरी या घाटाला जीवनदान द्याहो- पुलासह रस्त्याची दयनीय अवस्था



रस्ता डांबरीकरण व पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी 


मोठा वाघोदा प्रतिनिधी  



रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल लोहारा हे  आदिवासी पेसा क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. 


लोहारा व गुली लोहारा अशा दोन गावांना जोडणाऱ्या गावाच्या सुकी नदीच्या पुल घाटाला अनेक वर्षापासून खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. ह्या घाटातून प्रवास करीत असतांना अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.



सदर पुलाची व रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना सह पादचाऱ्यांना उमगत नसल्याचे जनता त्रस्त झाली आहे. वारंवार या पुल रस्ता व अपघातांच्या घाट रस्त्याबाबत विविध वृत्त पत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाले तक्रारी करून देखील सबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याच्या अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी कुंभकर्णाची झोप घेतली असल्याचे संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशी करीत आहेत.



त्यामुळे या सुकी नदीच्या घाटाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा लोहारा गावकऱ्यांचा आरोप आहे. तरी ह्या घाटात दिवसेंदिवस होणारे अपघात थांबविण्यासाठी रस्ता कांक्रीटीकरण अथवा डांबरीकरण व पुलाची दुरुस्ती किंवा नवीन उंच पुल बांधण्यात यावा. अशी लोहारा येथील गावकरी व परिसरातील जनतेची मागणी आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم