Khandesh Darpan 24x7

देशमुख विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे अभिनव उपक्रम




थोरगव्हाण प्रतिनिधी



थोरगव्हाण ता. रावेर येथे डी. एस . देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयानशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमाचे प्रास्तविक युवराज कुरकुरे यांनी केले. 26 जून जागतिक आंमली पदार्थ विरोधी दिवस निमित्त विद्यार्थ्यांना व्यसनांचे मानवी आरोग्यावर बाल मनावर होणारे शारिरीक मानसिक आणि आर्थिक दुष्परिणाम बाबत नशाबंदी मंडळ जळगांव जिल्हा संघटक प्रा. डॉ. दयाधन राणे (दादासाहेब दे. ना. भोळे महाविद्यालय, भुसावळ) यांनी मार्गदर्शन केले . 



प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दी. एज्यूकेशन सोसायटी, थोरगव्हाण अध्यक्ष तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सचिव चंद्रकांत चौधरी  होते. मान्यवर अध्यक्षांचा स्वागत सत्कार मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी केला, तर डॉ. दयाधन राणे यांचा स्वागत सत्कार पर्यवेक्षक डी. के. पाटील यांनी केला .


कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी मार्गदर्शनातुन आवाहन केले की, गुटखा, सुपारी, तंबाखू, जर्दा, नशायुक्त सोलेशन इ. कंपनी मालक फसव्या प्रभावी जाहिराती मधून शालेय तथा महाविदयालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे त्यापासून बालक व तरूण युवकांनी सावध राहा असा सल्ला दिला. संस्थेचे उपाध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर यांनी भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले .


प्रबोधन करणारे चित्र प्रदर्शन विद्यालयात दर्शनी भागात विद्यार्थांना पाहाण्यासाठी लावण्यात आले होते. त्याचा कुतुहलाने विविध प्रश्न विचारून सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला .


मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी मनोगत व्यक्त केले. सामुहिक प्रबोधन प्रतिज्ञा डी. के. पाटील यांनी वदवून घेतली .


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाय. जे. कुरकुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समिती सदस्य वाय. डी. कोष्टी यांनी मानले. प्रसंगी सर्व समिती सदस्य, शिक्षक बंधू, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم