प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महिला आघाडीच्या जळगाव (पूर्व) जिल्हा संयोजक पदी सावदा येथील प्रथित यश प्रसुतीतज्ञ डॉ. प्रियदर्शनी सरोदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्याबाबतचे जिल्हाध्यक्ष धंनजय पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र दि. 25 रोजी प्रदान करण्यात आले.
डॉ. सरोदे या माजी खासदार स्व. गुणवंतरावजी सरोदे यांच्या स्नुषा असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. राजकारण तसेच समाजकारणात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या डॉ. सरोदे यांच्या निवडीने ओबीसी मोर्चाच्या महिला आघाडीस बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रदेश ओबीसी मोर्चाचे सदस्य भरत महाजन यांनी केले.
याप्रसंगी प्रदेश सदस्य भरत महाजन यांच्यासह, राष्ट्रीय परिषदेचे डॉ. अतुल सरोदे, वाघोदा बु ll येथील ओबीसी मोर्चाचे संजय माळी, राहुल पाटील, बाळू काकडे, सावदा शहर अध्यक्ष जे.के.भारंबे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले व ओबीसी मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.
या निवडीबद्दल डॉ. सरोदे यांचे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष पूर्व अमोल जावळे आदींनी अभिनंदन केले.
डॉ. प्रियदर्शनी सरोदे यांचे निवडीबद्दल त्यांचे वर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
खान्देश दर्पण २४x७ परिवारातर्फे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन तथा पुढील सकारात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेछ्या.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
Post a Comment