प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दि. 26 जून बुधवार रोजी आरक्षणाचे जनक, दीन दुबळ्यांचे कैवारी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला उप प्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले, उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात राजश्री शाहू महाराजांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. प्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्य डॉ. हरिष नेमाडे, डॉ. जगदीश पाटील, डॉ. ए. के. पाटील, डॉ. शरद बिऱ्हाड़े, डॉ. सतिश पाटील, डॉ. दिपक सुर्यवंशी, डॉ. जयश्री पाटील, डॉ. योगेश तायडे, प्रा. शिवाजी मगर, प्रा. सीमा बारी, प्रा. आदिती ढाके, नितीन सपकाळे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बहुंसखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले व आभार प्रा. शेरसिंग पाडवी यांनी मानले.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
Post a Comment