Khandesh Darpan 24x7

सुमनस्मित चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तर्फे एक आगळावेगळा उपक्रम



प्रतिनिधी :   सारीका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, . संभाजी नगर, मध्य प्रदेश, सुरत व इतर सर्वत्र परिसरातील सर्व थोरसमाज (थोरगव्हाणकर) बांधवांसाठी नाशिक येथील सुमनस्मित चॅरिटेबल ट्रस्ट, श्री हेमंत काशिनाथ चौधरी रा. यावल ह. मु. नाशिक यांचे कुटुंबातर्फे ट्रस्टचे संस्थापक चेअरमन स्व. परेश हेमंत चौधरी यांचे स्मरणार्थ एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम विनामूल्य राबविण्यात येत आहे.


 


उपक्रम याप्रमाणे- जे विवाह इच्छुक वधू-वर आहेत यांचे वरील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वधु-वर मेळाव्यात नाव नोंदविणे, त्यांची नोंदणी फी जमा करणे, वधु-वर पुस्तिकाचे देयक जमा करून पुस्तिका घेणे हे दरवर्षी या पद्धतीने नोंदविणे ते सर्वांना जमेलच असे नाही, किंवा जमेलही पण दरवर्षी या सर्वांवर होणारा खर्च हा सर्वसामान्य गरीब परिवाराला करणे शक्य होत नाही किंबहुना होणार नाही. यासाठी सुमनस्मित चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक यांनी या सर्व वधु-वर मेळाव्यांमधून सर्व वधूवरांची माहिती मागवून (जमा करून) किंबहुना ज्यांना नव्याने वधु-वर मेळाव्यात आपापल्या वधू-वरांचे नाव नोंदवायचे आहे त्या सर्वांसाठी एक मध्यवर्ती असे पी.डी.एफ. स्वरूपातील व्यासपीठ तयार करीत आहेत.

 


या पी.डी.एफ. चे काम जोरात सुरू आहे. या पी.डी.एफ. सूची मुळे सर्वसामान्यांना दरवर्षी ठिकठिकाणी जाऊन आपल्या वधू-वरांचे नाव नोंदवणे, सूची घेणे, यासाठी होणारा खर्च, वेळ वाचविता येणार आहे. या पी.डी.एफ. चे वैशिष्ट्य असे की,  ही वधू-वर पी.डी.एफ सूची  सर्वांसाठी विनामूल्य कोणतेही फी न देता मिळणार आहे. यात काही बदल करायचे असल्यास जसे, यांचे लग्न जमले, नोकरीतील बदल हे तात्काळ केले जाणार असून अद्यावत (अपडेटेड) पी.डी.एफ. सूची प्रत्येकाला व्हाट्सअप द्वारे पाठविली जाणार आहे.

 

तरी सर्व थोर समाज (थोरगव्हाणकर) बांधवांनी या समाजपयोगी विनामूल्य कार्यास सहकार्य करावे असे ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.



नवीन विवाह इच्छुक वधू-वरांसाठी नोंदणी अर्ज 



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post