जळगाव, भुसावळ, मलकापूर येथील शाखा बरखास्तीचा निर्णय
भोरगांव लेवांचायत ठाया पाडळसे कुट्ंबनायक प्रभारीपदी ललितकुमार रमेश पाटील यांची निवड प्रसंगी आमदार एकनाथराव खडसे, आमदार शिरीष चौधरी व माजी खासदार उल्हास पाटील, विष्णु भंगाळे आदी पदाधिकारी. |
प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे ता. यावल या पंचायतीची बैठक पाडळसे येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश विठु पाटील उपस्थित होते. पंचायतीच्या बैठकीत एकमताने ठराव करीत नवीन कार्यकारिणीची घोषणा झाली. त्यात सहकुटुंबनायक म्हणून ललीतकुमार रमेश पाटील यांची निवड झाली. कुटुंबनायक रमेश विठु पाटील यांच्या तब्बेतीच्या कारणामुळे सहकुटुंबनायक म्हणून त्यांचे चिरंजीव ललीतकुमार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
अशी आहे नवीन कार्यकारिणी
कुटुंबनायक |
: |
रमेश विठु चौधरी |
सह कु्टूंबनायक |
: |
ललीतकुमार
पाटील |
कार्याध्यक्ष |
: |
एकनाथ
खडसे |
अध्यक्ष |
: |
डॉ.
उल्हास पाटील |
सचिव |
: |
अॅड संजय
राणे |
खजीनदार |
: |
बी. के.
चौधरी |
सदस्य |
: |
डॉ.
ज्ञानेश्वर पाटील,
विष्णु
भंगाळे, एन. टी. पाटील, दिनेश भंगाळे, मिलिंद वाघुळदे, आरती चौधरी, डॉ.प्रियदर्शनी सरोदे, सुहास चौधरी. |
आमदार एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या प्रस्तावात आमदार शिरीष चौधरी आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी अनुमोदन देवून ठराव मंजुर केला. यावेळी प्रभारी स्वरूपात नियुक्त केलेल्या जळगाव, भुसावळ आणि मलकापूर येथील विभागीय शाखेच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या. पंचायतीकडून लवकरच येथे नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने मंत्री रक्षा खडसेंच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी बी. के. चौधरी, विष्णू भंगाळे, मिलींद वाघुळदे, दिनेश भंगाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय राणे, एन.टी. पाटील, आरती चौधणी, डॉ. प्रियदर्शनी सरोदे, नीलेश राणे उपस्थित होते.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق