बलवाडी प्रतिनिधी
तांदलवाडी येथील रहिवासी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले विठ्ठल नारायण पाटील यांचा २६ वर्षीय मुलगा सिद्धांत विठ्ठल पाटील अमेरिकेत कॅलिफोर्नियातील कॅडेन्स डीझाईन सिस्टीम या कंपनीत नोकरी करत होता. तो दि. ४ जुलै पासून मित्रांसोबत सुटी निमित्त फिरायला अमेरिकेतील मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्क मध्ये गेला होता. दि. ६ जुलै रोजी टेकडी वर ट्रेकिंग करीत असतांना त्याचा पाय घसरल्याने तो नदीच्या प्रवाहात पडला आणि खाडी मध्ये दिसेनासा होण्याआधी दोन वेळेस दिसला असे प्रत्यक्षदर्शी मित्रांनी सांगितले.
त्याचा शोध घेण्यासाठी तेथील सुरक्षा व्यवस्था तात्काळ दाखल झाली आणि शोध कार्य सुरू झाले. हेलिकॉप्टर तथा ड्रोन च्या मदतीने शोध घेतला असता पाण्याची पातळी वाढल्याने अद्याप त्याचा शोध लागला नाही. तेथील पार्क रेंजर्नस नी सध्या शोध मोहीम थांबविली असल्याने सिद्धांत पाटील चे पुणे स्थित मामा प्रितेश चौधरी यांनी शोध कार्य करणाऱ्या पथका बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हे प्रकरण अमेरिकन सरकारकडे मांडण्याची विनंती केली आहे. ते सतत सीएटल मधील दुतावासाशी बोलत आहे. पण हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे.
सिद्धेश हा २०२० साली कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलीस (UCLA) मधून एम. एस. करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. २०२३ मध्ये तो कॅडेन्स मध्ये रुजू झाला होता.
सिद्धांत जिवंत असून लवकरच सकारात्मक बातमी समोर येईल अशी आशा त्याचे आई वडील, मामा- प्रितेश चौधरी आणि नातेवाईक, आप्तेष्ट ठेवून आहेत.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق