बलवाडी प्रतिनिधी : आशीष चौधरी
लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे नियोजन केले आहे. नागपूर येथील दिक्षाभूमीपासून ही यात्रा दि. २८ जुलै पासून निघणार असून ती मंत्रालय मुंबई येथे ८ ऑगस्टला पोहोचणार आहे.
या संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, राज्यातील संघटनेचे पदाधिकारी पत्रकार संवाद यात्रेत सहभागी झाले असून या यात्रेच्या माध्यमातून सर्वत्र जनजागृती करून या संवाद यात्रेचे पोस्टर्स लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, सामाजिक संघटना, राजकीय संघटना यांना पत्रकारांच्या समस्यांविषयी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
याच उद्देशाने निंभोरा स्टेशन ता. रावेर येथे महाराष्ट्र पत्रकार संघ रावेर तालुका अधिकारी यांच्या हस्ते निंभोरा पोलिस स्टेशन चे सपोनि हरिदास बोचरे यांना पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टर देण्यात येवून प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी खान्देश विभागीय प्रसिद्धी प्रमुख विनोद रामचंद्र कोळी (शिवाभाई), माजी तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे, उपाध्यक्ष सुमित पाटील, माजी उपाध्यक्ष प्रभाकर महाजन, जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे, गोकुळ भोई, आशिष चौधरी, पुरुषोत्तम संघपाल, संजय पाटील, पियुष चिंचोले यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निंभोरा पो.स्टे.चे पो. कॉ. गोपनिय विभागाचे अमोल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق