Khandesh Darpan 24x7

सावदा येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

रामराज्यासाठी साधना करण्यासह भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा! - प्रशांत जुवेकर. जळगाव.


प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी

व्यक्तीगत जीवनात साधना केल्याने अंतरंगात रामराज्याची स्थापना होईल; परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या जोडीला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा. आपले विचार आणि वर्तन हे हिंदु संस्कृतीला पूरक असायला हवे. ‘हॅलो’ नाही, तर नमस्कार किंवा ‘राम-राम’ म्हणणे, ही आपली संस्कृती आहे;टीव्ही’वरच्या मालिका पहाणे नाही, तर ‘कीर्तन-भजन’ पहाणे, ही आपली संस्कृती आहे; कुठला अभिनेता नाही, तर राम-कृष्ण हे आपल्या संस्कृतीने दिलेले आदर्श आहेत. आपल्या वागण्या-बोलण्यातून, आचारातून आपण संस्कृतीची जोपासना करूया. धर्माचे पालन करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव येथील प्रशांत जुवेकर यांनी या वेळी केले.



सावदा येथील कोचुर रोड  वरील नगरपालिका सभागृह याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच देशभरात ७१ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या वेळी अन्य वक्त्यांचे मार्गदर्शन झाले. 


या वेळी जळगाव येथील अधिवक्ता निरंजन चौधरी म्हणाले की, हिंदू वरील होणाऱ्या आघाताकरिता सर्वत्रच्या हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व बांधवांनी जात-पात, धर्म विसरून हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी संकल्प करूया असे आव्हान अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी केले.


महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प. पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. सावदा येथील हिंदू बांधव व भगिनींनी या गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घेतला.


‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कन्नड आणि बंगाली भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न झाले. या माध्यमांतून देशविदेशातील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’ चा लाभ घेतला.


या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post