Khandesh Darpan 24x7

…म्हणून पोहता येत असलेली लोकं सुद्धा जातात वाहून, पाहा १ मिनिटांत कसं वाढतं धबधब्याचं पाणी


पावसाळ्यात धबधब्यांवर जाऊ नका असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण पाण्याची मजा घेण्यासाठी लोकं धबधब्यांवर जातात आणि अचानक पाण्याची पातळी वाढते आणि लोकं वाहून जातात. अशी कितीतरी प्रकरणं आजवर घडली आहेत. पण पाण्याची पातळी अचानक कशी वाढते? हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा. आणि हो पावसाळ्यात नदीवर पोहायला जाणं टाळा कारण कधी काय घडेल सांगता येत नाही.




 खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


भुशी डॅममध्ये घडलेल्या प्रकरणामुळे अख्खा देश हादरला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणं वाहून गेली. बरं, हे प्रकरण ताजं असतानाच ताम्हिणी घाट, लोणावळा आणि पुण्यातून अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.

ज्यामध्ये लोकं पोहण्याचा आनंद घेण्याच्या नादात वाहून जाताना दिसताहेत. पण प्रश्न असा आहे लोकांना खरंच कळत नाही का नदीत कधी उतरायचं अन् कधी नाही ते? आश्चर्याची गोष्ट म्हणजे शहरी लोकांना नदीच्या पाण्याबाबत फारसा अनुभव नसतो पण चांगलं पोहता येत असलेली गावातली मुलं सुद्धा कशी काय वाहून जातात?


या प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पाहा एका मिनिटांत कसं धबधब्याचं पाणी वाढतं. आणि काही कळायच्या आत लोकं पाण्यात बुडू लागतात.

(फोटो सौजन्य - being_baramatikar/Instagram)





लोकं वाहून जाण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पाण्याची पातळी अचानक वाढणं. जवळपास सर्वच जण पाण्याची पातळी किती आहे? अन् तेवढं पाणी आपल्यासाठी सुरक्षित आहे का? हा विचार करूनच नदीत किंवा धबधब्यात उतरतात. पण अचानक डोंगरावर पाऊस पडतो आणि ते पाणी वाहत येऊन नदीची पातळी वाढते. अन् त्यामुळे आपसूकच वाहत्या पाण्याचा वेगही वाढतो.


अन् त्या वेगात सर्वसामान्य माणसाचा टीकाव लागत नाही आणि शेवटी तो वाहून जातो. या थिअरिचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ पाहा. यामध्ये तुम्ही पाहू शकता अवघ्या एका मिनिटांत धबधब्याचं पाणी कसं वाढतं.


“एका मिनिटांत धबधब्याचं पाणी कसं वाढतं बघा” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ being_baramatikar या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं या उद्देशानं हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


आतापर्यंत २० लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


मंदार गुरव

डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/how-the-water-of-the-waterfall-increases-within-1-minute-video-goes-viral/articleshow/111536765.cms

या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 
सहप्रायोजक आहे.

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post