प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण करण्यात येते. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला ई-पास मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे लाभार्थी धान्य घेण्यापासून वंचित राहत असून, उर्वरित धान्य लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी व्यक्त केली जात आहे.
सावदा येथील रास्त भाव दुकानावरील वाटप हि ई-पास मशीनच्या सर्व्हर डाऊन असल्याने थांबून राहिलेली आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होऊन लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. संपूर्ण शहरात सर्वर डाऊन असल्याने वाटपात अडथळे येत आहे. सावदा शहरात एकूण ८ रास्त भाव दुकाने असून त्या सर्व दुकानावर जवळजवळ ३ हजार ग्राहकांचे रेशन कार्ड आहे. त्यापैकी सर्वर डाऊन मुळे दि. २३ तारखेपासून फक्त ३० ते ३५ रेशन कार्ड धारकांना धान्य वाटप करता आले नंतर मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने रेशन दुकानदारांना या ग्राहकांची सामना करावा लागत आहे. तरी सदरहु सर्व्हर लवकरात लवकर सुरू करावे जेणे करून वाटप सुरुळीत सुरु करू शकता येईल अशी मागणी रास्त भाव दुकानदार यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुदतवाढ मिळावी
दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या कार्डधारकांना मोफत धान्य देणे अनिवार्य आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे बरेचशे कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा कार्डधारकांना त्यांचे धान्य मिळावे, यासाठी मुदतवाढ मिळावी व त्यांना धान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
إرسال تعليق