विद्यार्थ्यांना वाढदिवसा निमित्त पुस्तक भेट देणे स्तुत्य उपक्रम शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष संतोष राणे यांचे मत.
थोरगव्हाण प्रतिनिधी
डी. एस. देशमुख हायस्कुल थोरगव्हाण ता. रावेर येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना वाढदिवसा निमित्त पुस्तक भेट देवुन अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या, त्यात बालपोथी, गिताई, साने गुरुजी, महात्मा गांधी, विनोबा भावे यांचे जीवन कार्यावरील पुस्तकांचा समावेश आहे.
या प्रसगी उपस्थित शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष प्रकाश राणे यांनी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांला गिताई पुस्तक भेट देवुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी हुशार व शिस्त प्रिय अभ्यासू असतात असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. विद्यालयात या अनोख्या पद्धतीने सुरू असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
कला शिक्षक एस. बी. सपकाळे, भूगोल शिक्षक एम. के. पाटील, उपक्रम प्रमुख शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांचे या उपक्रमास सहकार्य लाभत आहे. पर्यवेक्षक डी. के. पाटील, उपक्रम शिक्षिका शितल तायडे, शिक्षक योगेश कोष्टी सर्व शिक्षक बंधु भगिनिंचे अनमोल सहकार्य प्राप्त होत आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق