Khandesh Darpan 24x7

मराठी सिनेसृष्टी पोरकी झाली



खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -


मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे आज १० ऑगस्ट, २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विजय कदम गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. 



त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना व्यक्त केली जातेय. 



जाहिरात 

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी निधन झाले ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज उशिरा अंधेरी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.  



विजय कदम यांनी रंगभूमी बरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं त्यांचं "विच्छा माझी पुरी कर" हे लोकनाट्य आणि "खुमखुमी" हा कार्यक्रम खूप गाजले. त्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.



"रथचक्र", "टूर टूर" यासारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी 1980 च्या दशकात लहान सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.



चष्मेबहाद्दर, पोलीस लाईन, हळद रुसली कुंकू हसलंआम्ही दोघे राजा राणी हे चित्रपट खूप नावाजले. आता त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم