हास्य कविता
सिनेमा
एकदा मले वाटल गुलाबाच फुल डोक्यात खोऊ
नटूनथटून मुरडत मटकत सिनेमाले जाऊ
लाखाची साडी मंग घातली माह्या सोंगावर
पसाभर गुलाबी पावडर थोपली माह्या तोंडावर
गुलाबाचा शेंडा वाईच डोक्यावर गेला
गुलाबी पावडरन नाकाचा शेंडा लाल केला
लाल लालीन मी न रंगोयल तोंड भारी
सगळ्या मैत्रिणीत दिशीन मीच लय न्यारी
काया काया गाॅगल घा-या डोयावर घातला
दोनचार अत्तरायचा फाया माह्या साडीवर मातला
किक मारून गाडीले निघाली आमची वरात
रस्ता आमच्या बापाचा सुसाट गाडी जोरात
सेल्फी फोटो काढयासाटी माह्या जीव व्हता आटला
हिरोइनपेक्षा मले माह्याच चेहरा भारी वाटला
सेल्फीचा नादात आम्ही ट्राफिक केली जाम
शिपायांन देल्ला हजाराचा दनका अन मले फुटला घाम!
चेहरा पुसला पदराने त काजळ लाली एक झाली
कशाचा बाई सीनेमा महाकाली रुपड्यान थेट घरी आली
घरी आल्यावर नवरा म्हणे काय गोंधळ झाला?
मीन म्हटलं बिगर शूटिंगचा माहयाच "सिनेमा" झाला
- माधुरी चौधरी वाघुळदे संभाजीनगर
९४२१८६०८७३
अशा कविता किंवा लेख फोटोसह प्रसिध्द करण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.
९४२३१८९५७२, ९८३४०४९२९७ ,९४२३९३८६५०
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment