Khandesh Darpan 24x7

विद्यार्थी हे आई-वडिलांच्या भविष्याचा आधार याची जाणीव ठेवा : सावदा स पो नि विशाल पाटील



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



थोरगव्हाण ता. रावेर येथे डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शालेय गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्ती गीत ये देश है वीर जवानो का या गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक डी. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण अध्यक्ष चंद्रकांत चौधरी होते.



इयत्ता 5 वी मधील विद्यार्थ्यांना 55 तर इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या गरीब होतकरू अभ्यासू विद्यार्थी विद्यार्थिनींना 11 शालेय गणवेश कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे शुभहस्ते वितरित करण्यात आले.



याप्रसंगी  "तुम्ही आई-वडिलांच्या भविष्याचा आधार आहात याचा विचार मनात ठेवा . त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवा. बारावी नंतर उच्च शिक्षण घेऊन नोकरी संपादन करण्यासाठी अथक परिश्रम करा व आई-वडिलांचे दारिद्र्य दूर करा. त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ देऊ नका. जि. प. शाळा व आपल्या हायस्कूल सारख्या  शैक्षणिक वारसा असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये आजही दर्जेदार गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते याचा अभिमान आहे. शिक्षणाच्या संधीचे सोने करा. दिलेले शैक्षणिक काम पूर्ण करणारे विद्यार्थी शिक्षकांना जास्त आवडते असतात त्यासाठी वेळेत अभ्यास पूर्ण करा." असे मोलाचे मार्गदर्शन सावदा सपोनि पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.



त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने चालवलेली मोफत स्कुल बस सेवा या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केलेल्या मनोगतात "शाळेच्या विकासात समाजिक सहभाग, उपक्रमात सहभागी दानशूर दात्यांचे कौतुक करून संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले. खाकी वर्दीचे महत्व व शिस्त आत्मसात करा, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे सारखे आदर्श ठेवून मोठे व्हा" असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.



या प्रसंगी खालील दात्यांचे अनमोल असे सहकार्य दिले गेले.

माजी विद्यार्थी दिनेश यशवंत राणे यांच्याकडून 25 ड्रेस, स्वर्गीय दगडू नारायण पाटील यांचे स्मरणार्थ बाळू नारायण पाटील यांचे कडून इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या गरीब विद्यार्थ्यांना ११ ड्रेस, संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांच्याकडून दोन हजार रुपये, संचालक कमलाकर त्रंबक चौधरी दोन हजार रुपये, रवींद्र काशिनाथ चौधरी दोन हजार रुपये, उखर्डू विठोबा चौधरी भोपाळ दोन हजार रुपये, सुलोचना चौधरी एक हजार रुपये, सुनील कोळी एक हजार रुपये, सन 1992 च्या माजी विद्यार्थी बॅच व्हाट्स अप गृप चे सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य दिले.  मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव यांच्याकडून दोन ड्रेस प्राप्त झाले त्यांचे वाटप संपन्न झाले .



या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संस्थेचे सचिव तथा अट्रावल चे पोलिस पाटील पवन चौधरी, संचालक शिक्षक कमलाकर चौधरी, शालेय समितीचे मधुकर कोल्हे, प्रा. संजय चौधरी, रवींद्र काशिनाथ चौधरी यांचे सह पुणे स्थित 1992 च्या बॅचचे प्रतिनिधी दिनेश यशवंत राणे, जितेंद्र वराडे, बाळू नारायण पाटील, कल्पना विजय पाटील यांची विशेष उपस्थिती व  अनमोल सहकार्य लाभले .पालक दाते शकुंतला चौधरी, सुनील कोळी, सावदा पो.स्टे. हवालदार विजय पोहेकर उपस्थित होते .



प्रसंगी   इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थिनी खुशी धनगर, ममता पाटील , मानसी पाटील , प्रिया तायडे, अंजली कुंभार या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत शिक्षक के. एम. पाटील, एस. बी. सपकाळे यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट असे सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. जे. कुरकुरे यांनी तर आभार जयश्री प्रवीण चौधरी यांनी मानले.



कार्यक्रम यशस्वीतेसाठी पालक संघाचे सुरेश ठाकरे सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बांधव, पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले. अतिशय स्तुत्य अशा या सामाजिक दायित्व उपक्रमाची पालक वर्गातून कौतुक केले जात आहे .



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم