प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबणासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. महिलांचा यात सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वांतत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वांतत्र्यासाठी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" सुरु करण्यात आलेली आहे.
सावदा नगरपरिषद मार्फत दि. ११ जुलै, २०२४ पासून नगरपरिषद परिसरातील नगरपरिषद पूरक इमारत व शहरातील इतर ३ ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षामार्फत साधारण ४००० महिलांचे फॉर्म स्विकारून त्या फॉर्म ला नारीशक्ती दूत ॲप द्वारे ऑनलाईन सुद्धा करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे रावेर तालुक्यामध्ये ४६४२७ अर्ज प्राप्त झाले होते. या फॉर्म ला विशिष्ट कालमर्यादेत स्विकृती द्यायचे असल्याने संपुर्ण रावेर तालुक्यातील एकुण ८००५ फॉर्म ला नगरपरिषद सावदा मदत कक्षाकडून स्विकृती देण्यात आलेले आहे.
सावदा शहरातील बचत गट तसेच इतर सर्व समाजघटकातील महिलांनी या योजनेस चांगला प्रतिसाद दिल्याने मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे.
सदरील कक्षामध्ये धिरज बनसोडे, कार्तिक ढाके, आकाश तायडे, महेश इंगळे, विनय खक्के, तेजस वंजारी, राजू मोरे, संदीप पाटील, अमित बेंडाळे व श्रेयस जैन इ. कर्मचारी यांचा समावेश होता.
या अभियानाला उत्कृष्ट पद्धतीने राबविण्यासाठी मा. मुख्याधिकारी भुषण वर्मा साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق