Khandesh Darpan 24x7

पाल घाटात आदिवासी पाड्यात शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर फुलले "हसू"





प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




रावेर तालुक्यातील पालघाटामधील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या गारबर्डी येथील आदिवासी पाड्यात हिंदू जनजागृती न्यासातर्फे आदिवासी शाळकरी मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.




आपल्या महाराष्ट्रातील पहाडपट्टीत राहणारा आदिवासी बांधव हा राजकारणी, समाजकारणी यांच्यापासून दुर्लक्षित असलेला समाज आहे. त्या समाजा पर्यंत परिपूर्ण असे शिक्षण, आरोग्य अजून पर्यंत पोहोचू शकले नाही. 



त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचण्याचा मानस ठेवून हिंदू जनजागृती न्यासा तर्फे कपडे वाटप, खाऊ वाटप, आदिवासींच्या गरजेच्या वस्तू वाटप करणे, मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच रक्त तपासणी करणे, आरोग्य तपासणी करणे, मुलींना स्वरक्षण प्रशिक्षण देणे, धर्मशिक्षण वर्ग, प्रथमोपचार वर्ग असे विविध उपक्रम महाराष्ट्रभर घेण्यात येतात याचाच एक भाग म्हणून हिंदू जनजागृती न्यास जळगाव तर्फे विशेष उपक्रमांतर्गत यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या पाल घाटामधील गारबर्डी या आदिवासी पाढ्यात मुला मुलींना खाऊ व शालेय साहित्य वाटप हिंदू जनजागृती न्यासाच्या सौ. छाया  भोळे, धीरज भोळे, स्वप्निल पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्याचे परिसरातून व तालुक्यातून  कौतुक होत आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post