प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
९ ऑगस्ट,२०२४ रोजी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नवीन शैक्षणीक धोरण-२०२० नुसार विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना धीर देत सांगीतले की, वाढलेल्या विषयांचा मनात कुठलाही संकोच न ठेवता अभ्यासाचे नियोजन करून यश मिळवा तसेच डॉ. जे. एस. पाटील यांनी भारतीय ज्ञान प्रणाली याविषयी मार्गदर्शन केले.
सदर सूत्रसंचालन व आभार डॉ. ईश्वर ठाकूर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस व्ही.जाधव, उपप्राचार्य डाॅ. हरीश नेमाडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्यासांखेने उपस्थित होते.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق